शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथे तरुण दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Updated: May 28, 2014 00:02 IST

अवघ्या दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना येथील गांधी वार्डात सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली

पांढरकवडा : अवघ्या दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना येथील गांधी वार्डात सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

रूपेश शंकरराव मुप्पीडवार (३२) आणि पल्लवी रुपेश मुप्पीडवार (२३) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांनीही घरातील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रूपेशचा विवाह ३0 नोव्हेंबर २0१२ रोजी मूल तालुक्यातील भेंडाळा येथील पल्लवीसोबत झाला होता. गांधी वार्डातील दोन मळ्याच्या घरात सर्वात वरच्या माळ्यावर ते राहत होते. सोमवारी सकाळपासून दोघेही घरी होते.

नेहमी खालच्या माळ्यावरील भावाकडे येणारा रुपेश सोमवारी एकदाही खाली आला नाही. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ नरेश रात्री १0 वाजताच्या सुमारास वरच्या माळ्यावरील रुपेशच्या घरी गेला. आवाज देऊनही दार उघडले नाही. शेवटी मित्रांच्या सहाय्याने दार तोडले. तेव्हा आतील दृश्य पाहून ते घाबरलेच. समोरच्या खोलीत असलेल्या स्वयंपाक घरात पंख्याला साडी बांधून पल्लवीने गळफास लावला होता. तर बेडरुममध्ये रुपेशने पंख्याला दुपट्टा बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या दोघांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. पांढरकवडा पोलीस अधिक तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)