शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील ऐतिहासिक वास्तू कुलूपबंद

By admin | Updated: May 27, 2014 01:09 IST

आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्‍यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली.

भूदान चळवळ : पंडित नेहरुंची भेट, स्मृतिदिनी तरी खुले होईल काय उद्यान

रूपेश उत्तरवार - यवतमाळ

आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्‍यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे क्षणाचा शुभारंभ यवतमाळातून झाला. यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा या स्थळाची साक्ष देणारी वास्तू यवतमाळात उभी आहे. मात्र ती कडेकोट कुलूपात बंदिस्त आहे. त्यामुळे नवी पिढी या ऐतिहासिक घटनेच्या माहितीपासून कोसो दूर आहे. मध्य प्रदेशात जमिनदार आणि भूमिहीनांमध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले होते. हा पेच सोडविण्यासाठी आचार्य विनोबा भावेंना बोलविण्यात आले होते. त्यावेळी विनोबा भावेंनी दोन्ही बाजू एकून घेतल्या आणि जमिनदारांना आपल्याकडील जमीन दान मागितली. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी केलेले वैचारिक परिवर्तन जमिनदारांनाही मनातून भावले. त्यावेळी जमिनदारांनी आपल्याकडील काही जमीन विनोबा भावेंना दान दिली. त्यांनी ही जमीन भूमिहीन कुटुंबात वाटप केली. विनोबा भावे यांचे हे काम सर्वांना प्रेरणादायी ठरले. यानंतर हा प्रश्न इतरही ठिकाणी भेडसावल्याने त्यावेळी विनोबा भावे यांनी पवनार येथून पदयात्रा काढली. प्रत्येक गावी त्यांनी वैचारिक परिवर्तनाचं कामं केलं आणि जमिनदारांना जमीन दान मागितली. ही भूदान चळवळ गावखेड्यात पोहोचली. याच चळवळीला यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. याठिकाणी एक लाख ३७ एकर शेतजमीन विनोबांना दान करण्यात आली. मिळालेले भूदान भूमिहीनांना देण्यासाठी कार्यक्रमही तयार करण्यात आला. त्यासाठी पंडित नेहरू यांना १८ एप्रिल १९५९ रोजी यवतमाळात निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. यावेळी झालेली सभा प्रचंड गाजली. या सभेनंतर भूदानातील जमिनीचे वाटप भूमिहीनांना करण्यात आले. त्यामुळे हा दिवस जिल्ह्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक आहे. यवतमाळच्या गोदणी मार्गावर सध्याच्या आकाशवाणी केंद्रालगत ही सभा झाली होती. यवतमाळ नगरपरिषदेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिमंच आणि उद्यान नावाने जागेचे सौंदर्यीकरण केले. याठिकाणी पंडित नेहरूंची झालेली सभा भिंतीवर छायांकित करण्यात आली. यासोबतच या सभेला उपस्थित मान्यवरांचे चित्रही आहे. ही ऐतिहासिक वास्तू उद्यानाच्या माध्यमातून अधिक खुलविण्यात आली आहे. मात्र हे सर्व सौंदर्य कुलूपबंद करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी आहे तरी, काय याची माहिती कुणालाही कळत नाही. सदर उद्यान सदैव खुले राहिल्यास तरुण पिढीला ऐतिहासिक वास्तूची कल्पना येईल. मात्र लागलेल्या कुलपाने इतिहास बंदिस्त झाला आहे. पंडित नेहरू यांचा मंगळवारी स्मृतिदिन आहे. या दिवसी तरी, नगरपरिषदेने ही वास्तू आणि उद्यान खुला करण्यासाठी पावले उचलले तर पंडित नेहरूंना खरी श्रध्दांजली ठरेल.