शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या चोरट्याला अमरावतीत रंगेहात अटक

By admin | Updated: March 25, 2017 00:10 IST

येथील अट्टल चोरट्याला मंगळसूत्र पळविताना अमरावतीच्या राजकमल चौकात रंगेहात अटक करण्यात आली.

मंगळसूत्र, वाहन चोरी : चार दुचाकी जप्त यवतमाळ : येथील अट्टल चोरट्याला मंगळसूत्र पळविताना अमरावतीच्या राजकमल चौकात रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस तपासात तो मंगळसूत्रच नव्हे तर अट्टल वाहन चोर असल्याचेही निष्पन्न झाले असून त्याच्या कबुलीवरून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. दिलीप ऐकूनवार (२९) रा. यवतमाळ असे या चोरट्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावतीमधील गजबजलेल्या राजकमल चौकात ओरिसातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकून पळ काढण्याचा प्रयत्न दिलीपने केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्याला शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नंतर गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला. तपासात त्याने आपण वाहन चोरीत सक्रिय असल्याची कबुली दिली. त्याने अमरावतीतून अनेक वाहने चोरली असून ती यवतमाळात विकली. त्याच्या कबुलीवरून अमरावतीच्या गुन्हे शाखा पथकाने यवतमाळातून चार वाहने जप्त केली आहेत. त्यामध्ये स्प्लेंडर (एम.एच-२७-एडब्ल्यू-७६७९), अ‍ॅक्टीव्हा (एम.एच.३१-बीडब्ल्यू-३५५८), हिरोहोंडा सीडी-१०० (एम.एच-२९-एम-९३०४) व स्प्लेंडर (एम.एच-३४-पी-८५५७) या वाहनांचा समावेश आहे. न्यायालयाने गुरुवारी त्याला पोलीस कोठडी सुनावली. तो सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून वाहन व मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अमरावतीच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुंडे अधिक तपास करीत आहे.