शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

भटकंती करीत लिहिली ८0 पुस्तके

By admin | Updated: May 13, 2014 00:14 IST

अवतीभोवतीचे वास्तव पाहून त्यांचे मन शाळेत लागत नव्हते. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळेला सोडचिठ्ठी दिली. हे विश्‍वची माझे घर म्हणत संसाराचा त्याग केला.

आर्णी : अवतीभोवतीचे वास्तव पाहून त्यांचे मन शाळेत लागत नव्हते. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळेला सोडचिठ्ठी दिली. हे विश्‍वची माझे घर म्हणत संसाराचा त्याग केला. पवनारच्या आश्रमात विनोबाजींच्या सानिध्यात तब्बल १५ वर्षे घालविली. त्या ठिकाणी मिळालेल्या दृष्टीमुळे देशाच्या कानाकोपर्‍यात भटकंती केली. यातून त्यांना नवी दृष्टी मिळाली. यातूनच जवळपास ८0 पुस्तकांना त्यांनी जन्म दिला. मूळच्या नाशिक जिल्ह्यातील श्रावण शिरसाठ यांची भटकंतीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नुकतेच श्रावण शिरसाठ आर्णी परिसरात येवून गेले. जीवनात सुखासाठी प्रत्येकजण धडपड करतात. मात्र या धावपळीतून माणसे निराशेच्या गर्तेत सापडतात. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या माणसांना प्रबोधनाची दिशा देण्यासाठी भटकंती करणार्‍या श्रावण शिरसाठ यांनी हाती लेखणी घेतली आहे. बालपाणापासूनच त्यांच्या जीवनावर विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी पवनार येथील आश्रमात वास्तव्य केले. विनोबाजींच्या सहवासामुळे त्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात भटकंती करतच हिमालय पर्वातावर एक वर्ष वास्तव्य केले. दक्षिण भारत, पॉन्डेचरी आश्रम, अरविंद घोष आश्रम, नर्मदा परिक्रमा आदी ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर दिग्रस तालुक्यातील साखरा या गावी बिजमवार कुटुंबाकडे ४२ वर्षे घालवीली.

अशातच इसापूर येथील व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज यांचा सहवास लाभला. त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याने प्रेरित होवून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी श्रावण शिरसाठ यांनी पुस्तके लिहिण्यास प्रारंभ केला. मधूबिंदू, शेवटची पायरी या पुस्तकातून व्यसनमुक्तीवर प्रहार केलेत. आजतागायत त्यांनी जीवनाच्या आचारसंहितेचे दिग्दर्शन करणारी जवळपास ८0 पुस्तके लिहिली आहेत.

सुखानंद बोध, विचारचक्र आदी पुस्तकांनी समाजमनावर वेगळी छाप पाडली आहे. नर्मदा परिक्रमा या पुस्तकातून त्यांनी जीवनाचा आनंद अधोरेखित केला आहे. वयाची पंचात्तरी गाठल्यानंतरही समाज प्रबोधनाचा त्यांचा वसा कायम आहे. आज इथे तर उद्या तिथे हा त्यांचा नित्यक्रम आहे.

गावागावात हातभट्टय़ांचा धूर निघत आहे. सहज उपलब्ध होणार्‍या दारूमुळे युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. गावांमध्ये भांडणतंटे वाढले. प्रसंगी जीवावर बेतण्याच्या घटनाही घडत आहे. या बाबींना कुठेतरी पूर्णविराम मिळावा, यासाठीच श्रावण शिरसाठ यांचा प्रयत्न आहे. गाव व्यसनमुक्त होवून शांती नांदावी, यासाठीचे त्यांचे प्रयत्न नागरिकांच्या सहकार्याने यशस्वीही होत आहे. (शहर प्रतिनिधी)