शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमा ओल्याच

By admin | Updated: November 9, 2014 22:34 IST

पाळीव प्राण्यांप्रमाणेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या उपचाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या जखमांना टाके घालण्यासाठी आवश्यक असलेले अ‍ॅन्टी रॅबीज सिरम संपूर्ण राज्यातच उपलब्ध

सुरेंद्र राऊत - यवतमाळ पाळीव प्राण्यांप्रमाणेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या उपचाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या जखमांना टाके घालण्यासाठी आवश्यक असलेले अ‍ॅन्टी रॅबीज सिरम संपूर्ण राज्यातच उपलब्ध नसल्याने आता या जखमा उघड्या ठेवण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या अ‍ॅन्टी रॅबीज सिरमचा तुटवडा असूनही याबाबत शासनस्तरावरून कोणताच पाठपुरावा करण्यात आलेला नाही. वन्य श्वापदांच्या हल्ल्यात झालेल्या जखमांना टाके घालता येत नाही. त्यासाठी आधी अ‍ॅन्टी रॅबीज सिरम हे इंजेक्शन जखमेच्या भोवती द्यावे लागते. त्यानंतरच त्या जखमेला टाके घालता येतात. असे न करता जखमांना टाके घातल्यास रॅबीजचे जंतु वाढण्याची भीती असते. बंद जखमेत रॅबीजच्या जंतुची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळेच वाघ, बिबट, आस्वल, रानडुक्कर, तडस, लांडगा या श्वापदांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचार करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. अ‍ॅन्टी रॅबीज सिरम ही लस खासगीत मिळत नाही. भारत सिरम नावाच्या कंपनीकडून या लसीचा पुरवठा केला जात होता. मात्र या कंपनीने महिन्याभरापासून हा पुरवठा बंद केल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. सिरम उपलब्ध नसल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या जखमा अद्यापही भळभळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सदोबा सावळी वन परिक्षेत्रातील माळेगाव येथे आस्वालाने हल्ला करून शिवाजी चौधरी (३२) याच्या डोक्याला चावा घेतला. यात शिवाजीच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. त्याला उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या रुग्णाला उपलब्ध असलेले अ‍ॅन्टी रॅबीज व्हॅक्सीन दिले. मात्र डोक्याची जखम शिवण्यासाठी आवश्यक असलेले सिरम उपलब्ध नसल्याने शेवटी या रुग्णाला नागपूर येथे हलविण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सदर रुग्णाला वर्धा आणि त्यानंतर नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले. मात्र येथेही अ‍ॅन्टी रॅबीज सिरम नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या जखमांवर टाके घालण्यात आले नाही. तो गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.