शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावात कामगारांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:27 IST

नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले.

ठळक मुद्देकिट न मिळाल्याने संताप : साहित्य वितरण करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले. मात्र किट कामगारांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. साहित्य वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे पदाधिकारीच उपस्थित नसल्याने गोंधळ वाढला. सायंकाळपर्यंत ही गोंधळाची स्थिती कायम होती.ज्या कामगारांनी आपली नोंद कामगार कार्यालयात केली आहे, त्यांना किट वितरित करण्यात येत आहे. याकरिता कामगार कार्यालयाकडे १६ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. कामगारांचे हे साहित्य वितरित करण्याची जबाबदारी त्रयस्थ संस्थेला सोपविण्यात आली आहे. या संस्थेला मजुरांची संपूर्ण माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यानंतर पाच हजार रूपयांची किट मजुरांना दिली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. तरी या ठिकाणी एजंटांनी डेरा टाकला आहे. हे एजंट मजुरांना पैसे मागतात. तुम्हाला किट मिळवून देतो, असे आश्वासन देतात. त्याचा ५०० ते २००० रूपये रेट आहे. या माध्यमातून मजुरांची लूट होत आहे.एजंटांच्या सूचनेनुसार मजूर सर्व कामे सोडून यवतमाळात येत आहे. किट वाटप करण्याची क्षमता १०० ते २०० इतकी असताना या ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार मजूर उभे राहत आहे. जिप्सी, ट्रॅक्स, मिनीडोअर, मालवाहू गाड्या भरून मजूर मध्यरात्रीच मुक्कामी येत आहे. पिंंपळगाव रोडवरील बालाजी मंगल कार्यालयालगत त्यांच्या रांगा लागत आहे.मात्र मंगळवारी या ठिकाणी किट वाटप करणारे कर्मचारीच आले नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रास्तारोको केला. यामुळे जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थिती स्फोटक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचारी पोहोचल्यावर आंदोलक शांत झाले. मात्र चर्चेनंतरही योग्य तोडगा न निघाल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाची स्थिती कायम राहिली.कामगारांनी एजंटांमार्फत काम करू नये. हे सारे काम मोफत आहे. एजंट आढळल्यास त्यांना कामगार कार्यालयाकडे आणावे. त्यांना योग्य धडा शिकविला जाईल.- राजदीप धुर्वे,जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Strikeसंप