शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम क्षेत्रातील कामगार असुरक्षित व पिळवणूकही

By admin | Updated: September 21, 2014 00:04 IST

बांधकाम क्षेत्रात कार्यरत मजुरांची प्रचंड दैनावस्था झाली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या दबावाने १९९६ मध्ये केंद्र शासनाने ‘बांधकाम कामगार अधिनियम’ तयार केला.

शिंदोला : बांधकाम क्षेत्रात कार्यरत मजुरांची प्रचंड दैनावस्था झाली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या दबावाने १९९६ मध्ये केंद्र शासनाने ‘बांधकाम कामगार अधिनियम’ तयार केला. मात्र हा अधिनियमच प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवला आहे. त्याची बांधकाम मजुरांना साधी माहितीसुद्धा नाही.बांधकाम क्षेत्रातील मजुरांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळण्यासोबतच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या अधिनियमांतर्गत राज्य शासनाने २००७ मध्ये नवीन कायदा निर्माण केला़ तथापि राज्य कामगार मंत्रालय आणि कामगार कल्याण कार्यालयातर्फे कुठेही या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या जिवीताची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. सोबतच बांधकाम क्षेत्रातील मजुरांना सुरक्षा पुरविणेही कंत्राटदाराचेच काम असल्याचे कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. कंत्राटदार, अभियंता यांच्याकडे ९० दिवस काम करणाऱ्या या क्षेत्रातील मजुरांचे ओळखपत्र तयार करणेही बंधनकारक करण्यात आले आहे़ सोबतच बांधकाम कामगारांना काम करताना सुरक्षेचे उपाय म्हणून हेल्मेट, पायमोजे, हातमोजे आदींचा पुरवठा कंत्राटदारांनी करावयाचा असतो. जे कंत्राटदार सुरक्षेची साधने पुरविणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूदही कायद्यात आहे़ बांधकाम मजुराचा काम करताना मृत्यू झाल्यास एक लाख रूपये व गंभीर आजारी पडल्यास १० हजारांची मदत देणेही कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे़ कामगाराच्या पत्नीची प्रसूती नैसर्र्गिकरित्या झाल्यास पाच हजार, तर सिझरेयीन झाल्यास १० हजार रूपये देण्याची तरतूद सुद्धा या कायद्यात करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे बहुतांश मजूर अल्पशिक्षीत असतात. त्यांना या नवीन कायद्याची माहितीच नसते. त्याचा लाभ बिल्डर लॉबी घेऊन कामगारांचे शोषण करते, असे चित्र आहे. कोणत्याही कामगाराचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांना मदत देण्यात येत नाही. अनेकदा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचू दिले जात नाही. मजुरांच्या हितासाठी कुणीही काम करीत नाही. त्यामुळे कामगारांना या कायद्यानुसार प्रत्यक्षात लाभच मिळत नसल्याचे वास्तव सर्वत्र दिसून येत आहे. कामगारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले जात आहे. मात्र कामगार संघटनाही अशा वेळी मूग गिळून दिसतात. त्यामुळे सर्वत्र बांधकाम क्षेत्रातील कामगारांची अद्यापही पिळवणूक सुरूच आहे. (वार्ताहर)