शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका ट्रेलरला धडकून महिला ठार, दोन जखमी

By admin | Updated: March 8, 2017 00:24 IST

स्वत:च्या रूग्णवाहिकेने आई व वडीलांना नागपुरातील खासगी रूग्णालयात तपासणी करून परत जात होते.

रस्त्यावर उभा नादुरूस्त ट्रेलर ठरला काळ : वाहन वणीचे, अपघात पिंपळगावात वणी : स्वत:च्या रूग्णवाहिकेने आई व वडीलांना नागपुरातील खासगी रूग्णालयात तपासणी करून परत जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला नादुरूस्त असलेल्या ट्रेलरच्या बाजुला लावण्यात आलेल्या दगडाला रूग्णवाहिकेने धडक दिली. त्यात रूग्णवाहिका पलटी झाल्याने रूग्णवाहिकेतील महिला जागीच मृत पावली, तर चालक व त्याचे वडील गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव गावानजिक सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडला. येथील वासेकर ले-आऊटमधील रहिवासी रवींद्र धर्मराव कांबळे हे आपल्या स्वत:च्या एम.एच.२९-टी.३९१८ या क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने आई व वडिलांना घेवून वैद्यकीय तपासणी करण्याकरिता नागपुरला गेले होते. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर रूग्णवाहिकेने नागपूरवरून वणीकडे परत जात असताना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव फाट्यानजीक एम.एच.४३-क्यु.९४५८ या क्रमांकाचा ट्रेलर नादुरूस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रेलरला कुठलीही लाईट लावले नव्हते, तर त्याच बाजुने दगड ठेवण्यात आले होते. य दगडाला रूग्णवाहिका धडकून पलटी झाली. त्यात रूग्णवाहिकेतील लिलाबाई धर्मराव कांबळे (६५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रवींद्र धर्मराव कांबळे व धर्मराव कांबळे गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. वरोरा पोलिसांनी ट्रेलर मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.(कार्यालय प्रतिनिधी)