शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जनधनच्या विड्रॉल मर्यादेने घरकूल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता बँकेत जमा होतो. घरकुलाचे आठवडाभरही काम झाल्यास दहा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो.

ठळक मुद्देदहा हजारांवर ब्रेक, साहित्य खरेदीचा प्रश्न, मजुरी तोडण्याची समस्या, आठवड्याचा खर्चच अधिक

निश्चल गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : बँकांतील बचत खाते जनधनला जोडले असल्याने रक्कम काढण्याला मर्यादा आली आहे. प्रामुख्याने घरकुलाच्या लाभार्थ्यांपुढे मोठा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम पूर्ण करायचे कसे, याची चिंता त्यांना सतावत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पुरेशा पैशांअभावी घरकूल अपूर्ण राहिल्यास अनेक लोकांना इतर ठिकाणी आसरा घेण्याची वेळ आली आहे.जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता बँकेत जमा होतो. घरकुलाचे आठवडाभरही काम झाल्यास दहा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. विविध प्रकारची साहित्य खरेदी, मजुरी द्यावी लागते. पण खात्यातून एवढी रक्कम एकाचवेळी काढता येत नाही.घराचे बांधकाम करण्यासाठी अनेकांनी जुनी घरे उकलून ठेवलेली आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण न झाल्यास निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. घरकूल लाभार्थ्यांची किरायाने राहण्याची ऐपत नाही. अशावेळी जनधन खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची मुभा मिळणे हाच एक चांगला उपाय असल्याचे सांगितले जाते.दारिद्र्यरेषेखालील आणि बेघर कुटुंबांना लाभग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील, बेघर आणि कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यासाठी लाभार्थी निवडले जातात. यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच घरकुलाचा लाभ मिळतो. यासाठी बराच कालावधी लोटला जातो. काही कुटुंब कर्ज काढून घराचे बांधकाम पूर्ण करून घेतात. मात्र त्यांना लाभ विलंबाने मिळतो. काही ठिकाणी तर कित्येक वर्ष लोटली जातात. यात त्यांच्यावर घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाच्या बोझ्यावरील व्याजाचा भुर्दंड बसतो. चांगले घर उभे होत असल्याने त्यांचीही सर्व सहन करण्याची तयारी असते. परंतु प्रशासनाकडून काही बाबतीत होणारी अडवणूक त्रासदायक ठरते.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना