शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; चार हजार जागांवर विद्यार्थ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शंभर जागा घटल्या : दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. यंदा जिल्ह्यात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याच्या पूर्वीच सुरू झाली आहे. मात्र अद्याप या प्रक्रियेला म्हणावी तेवढी गती आलेली नाही. जिल्ह्यात १६ शासकीय, दोन आश्रमशाळा आणि तीन खासगी अशा  २१ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये एकूण चार हजार १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. दहावीच्या गुणपत्रिका अद्याप न मिळाल्याने आयटीआयला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र लवकरच अर्ज वाढण्याची शक्यता आहे. 

दहावीच्या ‘भरघोस’ निकालाचा घोळ 

- दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा हा मानसिक घोळ अकरावी प्रवेशाच्या सीईटीनंतर मिटणार असून त्यानंतरच आयटीआय प्रवेशासाठी अर्ज वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

सर्वांनाच हवा ‘वायरमन’

मागील वर्षीप्रमाणे यंदाही वायरमन व इलेक्ट्रीशियन या दोन ट्रेडसाठी अर्ज येत आहे. इतर ट्रेडसाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असला तरी दोन ट्रेडवर अधिक भर आहे. राज्यात आयटीआयच्या १ लाख ३६ हजार जागांसाठी ४७ हजार ९४८ अर्ज आले. केंद्रीय पद्धतीची असल्याने जिल्ह्यातील अर्जांचा आकडा सध्या अस्पष्ट आहे. 

 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण