काँग्रेस उपाध्यक्ष पदासाठी आग्रही का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:06+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच्या १२ जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा दहा सदस्यांचा गट आहे. याशिवाय आणखी एक सदस्य राष्ट्रवादीकडे आहे.

Why not insist on the post of Congress Vice President? | काँग्रेस उपाध्यक्ष पदासाठी आग्रही का नाही ?

काँग्रेस उपाध्यक्ष पदासाठी आग्रही का नाही ?

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : अधिक जागा असून उपयोग काय ?, महाविकास आघाडीच्या बैठकीवर नजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाच्या अधिक जागा असताना काँग्रेस उपाध्यक्षपदासाठी आग्रही का नाही, हे पद राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यामागील सौजन्य काय, असा सवाल काँग्रेसच्या गोटात उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच्या १२ जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा दहा सदस्यांचा गट आहे. याशिवाय आणखी एक सदस्य राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेचा अध्यक्ष पदावर दावा आहे. दुसºया क्रमांकाचे अधिक सदस्य असल्याने नियमानुसार उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा असणे बंधनकारक आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेवर शिवसेना-काँग्रेसचा झेंडा फडकल्याचा संदेशही राज्यात जाईल. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल. परंतु काँग्रेसचे काही नेते उपाध्यक्ष पदाबाबत केवळ बंगल्याला खूश करण्यासाठी बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच कारणावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो.
अध्यक्ष पद शिवसेनेकडे जात असेल तर त्यांना सभापतीपद हे दुय्यम खात्याचे मिळावे, असा सूर आहे. हा पॅटर्न जिल्हा परिषदेतील सध्याच्याही सत्तेच्या रचनेत पहायला मिळतो. उपाध्यक्ष पद व एक महत्वाची समिती काँग्रेसकडे तर दोन सभापती पदे राष्ट्रवादीकडे असे समीकरण मांडले जात आहे. कमी जागा असताना राष्ट्रवादीसाठी तडजोड का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी शनिवार ११ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक होत आहे. यात कॉँग्रेसचे नेते उपाध्यक्ष पदासाठी आक्रमक भूमिका घेतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

असंतुष्टांच्या वेगळ्या समीकरणाला बसणार ‘चाप’
शनिवारच्या बैठकीत यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील उमेदवाराबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र खरा फोकस जिल्हा परिषदेवर राहणार आहे. या बैठकीतच जिल्हा परिषदेच्या सत्तेतील वाटा निश्चित होणार आहे. स्थानिक पातळीवर वेगळे समीकरण मांडण्यासाठी सर्वच पक्षातील काही असंतुष्टांची धडपड दिसून येते. त्यामागे ‘अर्थ’कारणाची लालसा हा प्रमुख हेतू आहे. परंतु महाविकास आघाडीचीच सत्ता बसविण्याचे धोरण ठरल्याने या असंतुष्टांची कोंडी होण्याची चिन्हे आहे.

Web Title: Why not insist on the post of Congress Vice President?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.