शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर आढळताच तातडीने गुन्हे दाखल करा

By admin | Updated: October 3, 2015 02:16 IST

बोगस डॉक्टरांमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

सचिंद्र प्रताप सिंह : सर्वसामान्यांचा जीव धोक्यात यवतमाळ : बोगस डॉक्टरांमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. चुकीचे उपचार झाल्याने रूग्णांच्या अवस्थेत गंभीरता येऊन रुग्ण दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत सर्वच बोगस डॉक्टरांवर तातडीने गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.महसूल भवन येथे बोगस तथा अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले आदी उपस्थित होते. यावेळी गेल्या वर्षात तालुकानिहाय आढळलेल्या बोगस डॉक्टरांसह त्यांच्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती डॉक्टर राठोड यांनी बैठकीत सादर केली. मार्च २०१५ पर्यंत जिल्ह्यात १९१ बोगस डॉक्टर आढळून आले आहे. त्यापैकी ७९ डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात आली आहे. एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत १४७ बोगस डॉक्टर आढळून आले असून यापैकी १७ डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक बोगस डॉक्टरांवर कार्यवाही झाल्याने अनेकजण दवाखाने बंद करून निघून गेल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्वाधिक बोगस डॉक्टर उमरखेड तालुक्यात व पाठोपाठ राळेगाव, वणी, पुसद, महागाव, दिग्रस येथे आढळून आले आहे. बहुतांश डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित डॉक्टरांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जे बोगस डॉक्टर दवाखाना बंद करून पळून गेले आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याबाबत त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अधिकृत नोंदणी नसलेल्या डॉक्टरांनी प्रॅक्टीसच करू नये. असे आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही केल्या जावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)ज्या पॅथीत शिक्षण, त्याच पॅथीत प्रॅक्टीससंबंधित डॉक्टरने ज्या पॅथीमध्ये (उपचार पद्धती) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे, त्याच पॅथीमध्ये त्या डॉक्टरने प्रॅक्टीस करणे आवश्यक आहे. अ‍ॅलोपॅथीची पदवी नसताना बीएचएमएस, बीएएमएस, इलेक्ट्रोपॅथी, नॅचरोपॅथीचे डॉक्टर अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रॅक्टीसची परवानगी नसताना सदर प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.