शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसची चाके निखळतात तेव्हा...

By admin | Updated: May 16, 2016 02:36 IST

‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो.

करळगाव घाटातील घटना : प्रवासी बचावलेयवतमाळ : ‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांच्या हृदयाचे ठोके चुकविणारी घटना रविवारी दुपारी १ वाजता करळगाव घाटात घडली. एसटी बसची मागील दोनही चाके निखळून गेली. चढावाचा भाग आणि चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवासी तारले गेले. यवतमाळ आगाराची ९३६६ या क्रमांकाची बस धामणगावहून यवतमाळकडे येत होती. बस यवतमाळजवळ पोहोचत असतानाच करळगाव घाटात या बसची चालकाच्या डाव्या बाजूकडील मागची दोनही चाके निखळून पडली. हा प्रकार होताच प्रवाशांना धक्का बसला. झाला प्रकार लक्षात येताच चालकाने बस जागीच थांबविण्यात यश मिळविले. हीच बस भरधाव असती तर मोठा अनर्थ घडला असता. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते असे सांगितले जाते.यवतमाळ आगारात बसच्या देखभाल दुरुस्तीकडे कसे दुर्लक्ष सुरू आहे, याचा पुरावा या घटनेच्यानिमित्ताने मिळाला आहे. मेकॅनिकलचा निष्काळजीपणा आणि आगार प्रमुखांचे नसलेले नियंत्रण याबाबीमुळे अशा गंभीर घटना घडत आहे. नटबोल्ट ढिले झाल्याने चाके निखळण्याची घटना घडली. यावरून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते. (वार्ताहर)