शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटीमध्ये बदलाची गरजच काय ?

By admin | Updated: September 10, 2016 00:58 IST

देशात दलितांवर अत्याचार वाढत आहेत. अ‍ॅट्रोसिटी कायद्यातील तरतूदींची निट अंमलबजावणीच केली जात नाही.

सुनील रामटेके : रिपब्लिकन पार्टीचा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावायवतमाळ : देशात दलितांवर अत्याचार वाढत आहेत. अ‍ॅट्रोसिटी कायद्यातील तरतूदींची निट अंमलबजावणीच केली जात नाही. अशावेळी या कायद्यामध्ये बदल करण्याची गरजच काय आहे, असा सवाल रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (खोब्रागडे) राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटेके यांनी उपस्थित केला.शुक्रवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा यवतमाळात पार पडला. त्यानिमित्त रामटेके यवतमाळात आले होते. ते म्हणाले, विदर्भातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच पर्याय आहे. या मुद्यावर आमचा शिवसेनेच्या भूमिकेला प्रखर विरोध आहे. देशाच्या विकासाकरिता बाबासाहेबांनीही छोट्या राज्यांची भूमिका मांडली होती. समाजातील कमजोर घटकांचा विकास छोट्या राज्यांमध्येच होऊ शकतो. अ‍ॅट्रोसिटीमध्ये बदल करण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र, दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे काय? या बाबत आम्ही राज्य शासनालाही निवेदन दिले आहे. याची प्रभावी अंमलबजावणीच होत नाही. मग कायदा बदलवायचा म्हणजे तो रद्द करण्याचा डाव आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सुनील रामटेके म्हणाले की, यवतमाळात अनेक मुलभूत प्रश्न प्रलंबित आहे. रस्ते खराब आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आणि इथले प्रतिनिधी विकासाचा गप्पा मारतात. वास्तविक त्यांच्या उदासीनतेमुळेच हे प्रश्न कायम आहे. विदर्भातील मागासलेल्या घटकांचा विकास करायचा असेल तर शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासारख्या विविध महामंडळांचे पुनर्गठण झाले पाहिजे. त्यावर नवे पदाधिकारी दिल्याशिवाय गोरगरिबांना कर्ज मिळणे शक्य नाही. दारिद्र रेषे खालील नागरिकांसाठी शासनाने विविध सवलती जाहीर केल्या. मात्र त्यांचा लाभ श्रीमंत वर्गच लाटत आहे. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलले पाहिजे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात ते म्हणाले, विदर्भातील नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्ही उतरू. प्रत्येक जागेवर उमेदवार देऊन रिपाइं (खोब्रागडे) स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार आहे. पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (खोब्रागडे) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सेवक गजभिये, राष्ट्रीय महामंत्री तुलसी पगारे, संघटन मंत्री रावसाहेब ढेपे, झारखंड प्रदेशाध्यक्ष संजय कुमार, अमरावती प्रदेशाध्यक्ष रमेश रामटेके, नागपूरच्या सपना प्रधान, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुधाकर घायवान, कुणाल आठवले, अंबादास येरमेकर, जिल्हा प्रभारी मुजीबोद्दीन, प्रवक्ता जफर कनौजी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)