शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचानेच केला पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: May 15, 2014 02:25 IST

दिग्रस तालुक्यातील साखरा येथील सरपंचाने हेतुपुरस्सर गावातील काही भागातील पाणीपुरवठा बंद करून गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप ..

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील साखरा येथील सरपंचाने हेतुपुरस्सर गावातील काही भागातील पाणीपुरवठा बंद करून गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.साखरा येथील विशाल चव्हाण आणि इतर गावकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, गावातील सरपंचांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान गावातील काही नागरिकांनी माझ्या मर्जीविरुद्ध इतर पक्षाला मतदान केल्याची बाब समोर केली. याच कारणातून गावातील काही भागात ग्रामपंचायतमार्फत होणारा पाणीपुरवठा बंद केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि गावात पाण्याचे इतर स्त्रोत नसल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे.साखरा गावची लोकसंख्या दोन हजार ७00 असून गावामध्ये दोन विहिरी आहे. त्यातील पाणीसुद्धा अत्यल्प प्रमाणात आहे. गावात असलेले तीन हातपंप बंदस्थितीत आहे. ग्रामपंचायतीमार्फत नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होत होता. त्यातून गावकर्‍यांना कसेतरी पिण्याचे पाणी मिळत होते. परंतु सरपंचांनी आता हा पाणीपुरवठा बंद केला आहे. नागरिकांनी सरपंचांना या बाबत विचारले असता त्यांनी पाईप फुटले आहेत, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिली.सरपंच स्वत:च्या टँकरने पाणी आणून जवळच्या लोकांना त्याचे वितरण करत आहे. गावातील ठराविक नागरिकांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवत आहे. या गंभीर प्रकरणाची शासनाने त्वरित दखल घेवून दोषींवर कडक कारवाई करावी व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी साखरा येथील विशाल चव्हाण, रोहदास चव्हाण, पवन आडे, दुर्गादास चव्हाण, आशिष चव्हाण, अनिल राठोडव इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)