शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पानठेले, चहा कँटीन उघडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. पानठेला, चहा कँटीन, ऑटोरिक्षा चालक, झुनका भाकर केंद्र चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी राहून मरण्यापेक्षा परिस्थितीशी लढाई करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी या व्यावसायिकांनी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्त्व या व्यावसायिकांना लाभणार आहे.

ठळक मुद्देअसोसिएशनचे निवेदन : वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अधिकृत परवानगी देत नसाल तर नाईलाजाने व्यवसाय सुरू केला जाईल, असा इशारा पानठेला, चहा कँटीन, हॉटेल व्यावसायिक आदींनी दिला आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी यवतमाळ शहर पानशॉप असोसिएशनने निवेदन सादर केले.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. पानठेला, चहा कँटीन, ऑटोरिक्षा चालक, झुनका भाकर केंद्र चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी राहून मरण्यापेक्षा परिस्थितीशी लढाई करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी या व्यावसायिकांनी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्त्व या व्यावसायिकांना लाभणार आहे.दुकानाचे भाडे, बँकेचे हप्ते, बचत गटाचे कर्ज, वीज बिल थकीत झाले आहे. याशिवाय अनेक प्रश्न निर्माण झाल्याने कुटुंब त्रस्त आहे. आज व्यवसाय सुरू करण्याची गरज असून परवानगी मिळावी, असे निवेदन असोसिएशनतर्फे देण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश राठोड, पान असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मिरासे, उपाध्यक्ष राहुल ढळे, सचिव सूर्यकांत सावदे, सहसचिव प्रथमेश कपुले, कोषाध्यक्ष पप्पू चौकडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय गायकवाड, शैलेश भानवे, लक्ष्मीकांत लोळगे, लक्ष्मण पाटील, राजाभाऊ तलवारे, प्रसेनजित भवरे, शिवदास कांबळे, विवेक वाघमारे, विनोद बिसेन, सुरेश बिसेन, रोशन गजभिये, दुर्गेश कवाडे, राजेश यादव, राजू सचदिवे आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी