शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

या ठिकाणी शहरातील विविध १६ व्यापाऱ्यांचे साहित्य ठेवले जाते. चार गोदामांत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या गोदामामध्ये चप्पल, बूट, प्लास्टिक,  ताडपत्र्या आणि स्टेशनरी साहित्य ठेवण्यात आले होते. सकाळी अचानक या गोदामाला आग लागली. या गोदामाची आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेची फायर यंत्रणा तात्काळ पोहोचली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. यानंतरही आग एका ठिकाणावरून दुसऱ्या गोदामाकडे सरकत गेली. तसा  आगीचा चांगलाच भडका उडाला.

ठळक मुद्देभिंत कोसळली, टीनही वितळले : चप्पल आणि स्टेशनरी साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामाच्या मागील बाजूला असलेल्या गोदामाला रविवारी सकाळी आग लागली. या गोदामात असलेले  लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. आगीचा प्रकोप इतका मोठा होता की, भिंती कोसळल्या, टीन वितळले. ही आग दुपारनंतरही धुमसत  होती. आग नियंत्रणासाठी यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले होते.  रविवारी सकाळी ८.४५ वाजता मालानी गोदामाला आग लागली. या ठिकाणी शहरातील विविध १६ व्यापाऱ्यांचे साहित्य ठेवले जाते. चार गोदामांत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या गोदामामध्ये चप्पल, बूट, प्लास्टिक,  ताडपत्र्या आणि स्टेशनरी साहित्य ठेवण्यात आले होते. सकाळी अचानक या गोदामाला आग लागली. या गोदामाची आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेची फायर यंत्रणा तात्काळ पोहोचली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. यानंतरही आग एका ठिकाणावरून दुसऱ्या गोदामाकडे सरकत गेली. तसा  आगीचा चांगलाच भडका उडाला. या ठिकाणची भिंत कोसळली, गोदामावर असलेले टीन आगीत वितळून गेले.  आग वाढत असल्याने बाजूच्या गोदामातील साहित्य इतरत्र हलविण्यासाठी मोठी धावपळ या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी असलेल्या चार  गोदामांच्या बाजूला टाइल्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यालाही फटका बसण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  

चप्पल, बुटांचा साठा जळाल्याने धुराचे लोट गोदामाला लागलेल्या आगीमध्ये बूट आणि चप्पलचा मोठा साठा जळाल्याने व्यापारी चांगलेच हादरले आहेत. तलाठ्यांनी या ठिकाणचा पंचनामा केला. लाखोंचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. दिवसभर अग्निशमन यंत्रणा आग विझविण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र चप्पल, बुट हा रबरी तसेच कातडी माल जळाल्याने आग आटोक्यात आणणे कठीण गेले. या गोदामांमध्ये प्लास्टिकचा माल असल्याने आगीचे लोट दूरवर पसरले होते. 

 

टॅग्स :fireआग