वणी, पांढरकवडा विभागात अवकाळी पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:13+5:30

दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची कापणी होऊन पिकाचे ढिगारे उभे करण्यात आले आहे.

Wani, pandharkavda Prematurely rains in this area | वणी, पांढरकवडा विभागात अवकाळी पावसाचे थैमान

वणी, पांढरकवडा विभागात अवकाळी पावसाचे थैमान

Next
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही फटका : गहू, हरभरा पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सोमवारी दुसºयाही दिवशी वणी व पांढरकवडा विभागात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात कापणी करून ठेवलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची कापणी होऊन पिकाचे ढिगारे उभे करण्यात आले आहे. त्याला पाणी लागू नये म्हणून शेतकरी धावपळ करित होते. मारेगाव परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सोमवारी मारेगावचा बाजार होता. पाऊस सुरू झाल्याने बाजारहाटासाठी आलेले नागरिक व व्यापाºयांची चांगलीच धांदल उडाली. पांढरकवडा उपविभागात पांढरकवडा तालुक्यातील वाºहा कवठा परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे अर्धा तास हा पाऊस कोसळला. अनेक शेतकºयांची हरभरा पिकाची कापणी झाली असून मळणीसाठी पिकाचे ढिग शेतात उभे केले होते. परंतु अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कमल राऊत, नारायण कोरेवार, शुभम डंभारे, निता डंभारे, मधुकर अडगुलवार, माधव डंभारे या शेतकºयांना पावसाचा फटका बसला. झरी तालुक्यातही सोमवारी दुपारी अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे होळी सणावर विरजण पडले. वेचणी न झालेल्या कापसालाही या अवकाळी पावसाचा चांगला फटका बसला.

 

Web Title: Wani, pandharkavda Prematurely rains in this area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस