शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

माणसामाणसात जात, धर्म, पंथाची भिंत उभी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठेच मिळत नाही. आपल्या आजुबाजूच्या लोकांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. अनिल पटेलांसारखे समाजसेवी डॉक्टर सतत कार्यरत असतात.

ठळक मुद्देराणी बंग यांची खंत : अनिल पटेल यांना ‘वंदन’ सन्मान, राठी परिवारासह मित्र परिवाराचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आज घरात, गावात माणसांची बेटं बनली आहेत. माणसामाणसात जात, धर्म, पंथ, समुदायाची काचेची भिंत उभी झाली आहे. ही दरी मिटविण्यासाठी युद्धाची नव्हे, तर सामोपचाराच्या भाषेची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘सर्च’च्या प्रमुख डॉ. राणी बंग यांनी येथे केले. दिवंगत मोहनलाल राठी स्मृती प्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘वंदन’ सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावर्षी चतुर्थ वंदन सन्मान यवतमाळ येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल पटेल यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. श्यामसुंदर भुतडा होते. यावेळी शांताबाई राठी, ‘सर्च’चे विश्वस्त डॉ. उपेंद्र वेदपाठक प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठेच मिळत नाही. आपल्या आजुबाजूच्या लोकांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. अनिल पटेलांसारखे समाजसेवी डॉक्टर सतत कार्यरत असतात. समाजाला दिशा देण्याचे काम संवेदनशील माणसंच करतात. नवीन पिढीकडे प्रचंड ऊर्जा आहे. या ऊजेर्चा समाजाच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे, असे डॉ. बंग म्हणाल्या.यावेळी डॉ. अनिल पटेल यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान समाजातील पीडित आणि गरीब रुग्णांना समर्पित करत असल्याचे डॉ. अनिल पटेल यांनी सांगितले.डॉ. श्यामसुंदर भूतडा यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यापूर्वी वंदन सन्मान शेषराव डोंगरे, मतीन भोसले, मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण अग्रवाल, संचालन कमल बागडी यांनी केले. आभार सुरेश राठी यांनी मानले. यशस्वीतेसाठी राठी परिवारासह मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.