शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

५२६ शेतकर्‍यांना माती परीक्षण अहवालाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 22, 2014 01:37 IST

शेतकर्‍यांना भरघोस उत्पादन घेता यावे म्हणून माती परीक्षणाची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.

बाभूळगाव : शेतकर्‍यांना भरघोस उत्पादन घेता यावे म्हणून माती परीक्षणाची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. माती नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच पिकांचे नियोजन केले तर भरघोस उत्पादन होऊ शकते. बाभूळगाव कृषी अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील ५२६ शेतकर्‍यांच्या शेतातील माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. मात्र पावसाळा तोंडावर येवूनही माती परीक्षणाचे अहवाल अजूनही प्राप्त न झाल्यामुळे शेतकर्‍यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी सतत आर्थिक विवंचनेत जगत आहे. लागलेला खर्च व शेतातून निघालेले उत्पादन याचा मेळ बसताना दिसत नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे, ही बाब प्रकर्षाने समोर आली.

शासनाकडून या संदर्भात जनजागृतीही करण्यात आली. परिणामी आपल्या शेत जमिनीत कोणती द्रव्ये किती प्रमाणात याची माहिती प्राप्त होते. त्यामुळेच तालुक्यातील शेतकर्‍यांनी बाभूळगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माती नमुने आणून दिले. यासाठी लागणारे निर्धारित शुल्कसुद्धा शेतकर्‍यांनी भरले आहेत. मात्र अजूनपर्यंंत या माती नमुन्याचे अहवालच प्राप्त झाले नाही.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ येथे मृद परीक्षण केंद्र असताना त्यांनी बाभूळगाव तालुक्यातून गोळा केलेली माती अमरावती जिल्ह्यातील घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्रात पाठविण्याचे आदेश येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिले. या कार्यालयाने २0१३-१४ साली गोळा करण्यात आलेले ५२६ शेतकर्‍यांच्या शेतातील मातीचे नमुने अमरावती जिल्ह्यातील घातखेड येथे पाठविले. २८ फेब्रुवारीला पाठविलेल्या नमुन्याचे अहवाल अद्यापपर्यंंत प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतातील मातीतील घटकांचे प्रमाण समजण्यास उशिर होत आहे.

सदर माती नमुने वेळेवर आले असते तर शेतकर्‍यांना त्या प्रमाणे नियोजन करता आले असते. पावसाळा तीन आठवड्यावर येवून ठेपला असताना माती परीक्षणाचे अहवाल मात्र येण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)