शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

वाघापूरचे नाना-नानी पार्क बनले टवाळखोरांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

नाना-नानी पार्क टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. त्यांना हटकणाऱ्यांवरच चाल केली जाते. या प्रकारात एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार करून याठिकाणी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेकडे तक्रार : सुरक्षा रक्षक व वेळेचे बंधन पाळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी आणि नागरिकांना विरंगुळ्यासाठी तयार करण्यात आलेले वाघापूर येथील नाना-नानी पार्क टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. त्यांना हटकणाऱ्यांवरच चाल केली जाते. या प्रकारात एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार करून याठिकाणी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी करण्यात आली आहे.नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१५ मध्ये येत असलेल्या चितळकर ले-आऊट, राजस्व कॉलनी याठिकाणी हा नाना-नानी पार्क तयार करण्यात आला आहे. पार्क निर्मितीला मूठमाती मिळाली आहे. अल्पवयीन मुला-मुलींनी या पार्कला टवाळखोरीचा अड्डा बनविला आहे. अशोभनीय वर्तनही याठिकाणी केले जात आहे. यातूनच हाणामारीचे प्रकारही झालेले आहेत. परिसरातील नागरिकांनी येऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न जीवावर बेतण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.रात्री उशिरापर्यंत या पार्कमध्ये मुले-मुली एकांत शोधण्याचेही प्रकार घडत आहे. एवढेच नव्हे तर मद्य शौकिनांनीही दारूचा गुत्ता बनविला आहे. ही बाब लोहारा पोलिसांना दूरध्वनीद्वारे वारंवार कळविण्यात आली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. नाना-नानी पार्कमध्ये घडत असलेल्या प्रकारामुळे शांतता व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक देण्यात यावा, पोलीस गस्त वाढवावी, पार्क उघडे ठेवण्यास मर्यादा असावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परिसरातील नगरसेवकांनाही मागण्यांचे निवेदन सादर केले.

टॅग्स :Socialसामाजिक