शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाघापूर ग्रामपंचायतीच्या ४० लाखांच्या अपहारावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 28, 2014 23:45 IST

शहरा लगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसचिवाने संगनमाताने ४० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केली होती. या तक्रारीची सखोल चौकशी

सदस्यांची तक्रार : शासकीय योजनांचा निधी हडपलायवतमाळ : शहरा लगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसचिवाने संगनमाताने ४० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केली होती. या तक्रारीची सखोल चौकशी करून लाखोंच्या अपहारावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याच प्रकाराचा हिशेब आढळून आला नाही. दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेली कामे ग्रामसभेतून न निवडता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दलितवस्ती सुधारयोजनेतील कामांची मोजमाप पुस्तिका आणि कामाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीमध्ये नसल्याने यात अपहार झाल्याचे दिसून येते. रोजगार हमी योजनेतून मंजूर रोपवाटिका, रस्ता खडीकर या कामावर पंचायत समिती स्तरावरिल संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन न घेता परस्पर ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. याबाबतचे कोणतेच दस्तऐवज उपलब्ध झाले नाही. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात तीन लाख ८० हजार रुपयांचा मुरूम न टाकताच खोटे बिल काढले आहे. निविदा न बोलाविता इलेक्ट्रीक साहित्याची खरेदी केली. स्टेशनरी, कार्यालयीन खर्च, डिझल, ट्रॅक्टर दुरूस्ती, रोजनदारी मजूर कामावर नसतांना कामावर दाखविले, मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेत मंजूर प्राकलनानुसार काम न करता दुसरीच कामे केली. सार्वजनिक शौचालयाकरिता गावातील नागरिकांकडून लोकवर्गणी गोळा करून २० टक्के रक्कम भरण्यात आली. याबाबतचे कोणतेच दस्तऐवज ग्रामपंचायतीमध्ये आढळून आले नाही. ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार हा घरून सुरू असल्याचे सिध्द झाले आहे. दोन्ही चौकशी अधिकाऱ्यांनी प्राथमिकस्तरावर येथील ग्रामसेवक जगताप यांना दोषी ठरविले आहे. यात सरपंचाचा कितपत सहभाग आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे.आर्थिक अफरातफर असल्याची तक्रार आठ ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. याची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी व्ही.एल. खेडकर आणि विस्तार अधिकारी आर. आर. खरोडे यांची समिती नेमण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली. यात धक्कादाय प्रकार उघडीस आला आहे. तक्रार कर्त्यां ग्रामपंचायत सदस्यांनी केलेले जवळपास सर्वच आरोप सिध्द झाले आहेत. शासकीय योजनांसह इतरही निधीत अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाघापूर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार असून येथील कामाकाजाचा बोजवारा उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोेणतीच सुविधा मिळत नाही. आता या दोषी ग्रामसेवक आणि सरपंचावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विक्की राऊत, प्रफुल गुजलवार, राजेंद्र तलवारे, राजू चांदेकर, जितेंद्र धानके, नितीन मिर्झापुरे, दिलीप मडावी, शिला इंगोले यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)