शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील गावांना धोका

By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST

तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़

वणी : तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़तालुक्यातून वर्धा, पैनगंगा आणि विदर्भा नदी वाहते. त्यापैकी विदर्भा नदी काठावर वसलेल्या घोन्सा, दहेगाव, साखरा, दरा, बोपापूर, कुंभारखणी, बोर्डा, कायर या गावांमध्ये सध्या दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा समज झाला आहे. गेल्या सप्ताहात पावसाने तीन दिवस सतत हजेरी लावली होती़ त्यामुळे जंगल व नाल्यातील पाणी व वेकोलि खाणीतील रसानयुक्त पाणी नदीमध्ये मिश्रीत झाले आहे. तालुक्यातील विदर्भा नदीची पातळी थोड्या प्रमाणात वाढली आहे़ परंतु नदीचे पाणी मात्र संपूर्ण गढूळ दिसून येत आहे़ तेच पाणी पाईपलाईनद्वारे नदी काठावरील पाण्याच्या टाकीत ओढले जाते व त्यानंतर गावामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो़नदीतून टाकीत येणारे पाणी व्यवस्थित निर्जंतुकीकरण होत नाही. त्याबाबत ग्रामपंचायती उदासीन आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्याच दूषित पाण्याचा पुरवठा होतो. ते पाणी प्राशन केल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ त्याचबरोबर मुक्या जनावरांनाही तेच पाणी प्राशन करावे लागत असल्याने त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे़ संबंधित ग्रामपंचायती या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे़ ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीमध्ये योग्य प्रमाणात ब्लिचींग पावडरचा वापरही करीत नाहीत. दूषित व गढूळ पाण्याचे व्यवस्थित निर्जंतुुकीकरण केले जात नाही. त्यामुळे नदी काठावरील गावात दूषित पाणी पोहोचत आहे़ सध्या ग्रामीण भागामध्ये साथीच्या विविध आजारांची लागण होत आहे. प्रत्येक घरी एक ना एक, रूग्ण हमखास आढळत आहे. त्याला दूषित पाणीच कारणीभूत ठरत आहे. नदी काठावरील प्रत्येक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपययोजना करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभाग ग्रामपंचायतींना ब्लिचींग पावडर पुरविते. मात्र ते नेमके जाते कुठे, असा प्रश्न आहे. कारण नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात ब्लिचींग पावडर टाकल्याचा लवलेशही नसतो. परिणामी ग्रामस्थांनाच पावसाळ्यात विविध साथ रोगांना तोंड द्यावे लागते. (कार्यालय प्रतिनिधी)