शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

अदृश्य विषाणूचे गाव, शहरांना काटेरी कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

देशात उद्भवलेल्या कोरोना या अदृश्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले. सर्व नागरिक कोरोनामुळे भयभीत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहे. अनेकांना लागण झाली आहे. महागाव शहर व तालुका या संकटापासून दूर राहील, अशी स्थिती गेल्या १० दिवसांपर्यंत कायम होती. मात्र मुडाणा येथील सराफा व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यूसुद्धा झाला.

ठळक मुद्देकोरोनाचा इफेक्ट, गाव, शहर सील करण्यासाठी काटेरी फांद्यांचा केला जातोय वापर

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जनावरांपासून शेतातील पिकांचा बचाव करण्यासाठी काटेरी कुंपणाचा वापर होत असल्याचे आपण नेहमी पाहत आलो. आजही बऱ्यापैकी बाभळीच्या झाडांच्या काटेरी कुंपणाचा ग्रामीण भागात वापर होतो. मात्र आता कोरोना या अदृश्य विषाणूच्या दहशतीने हेच काटेरी कुंपण गावबंदी व शहर बंदीसाठी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे.देशात उद्भवलेल्या कोरोना या अदृश्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले. सर्व नागरिक कोरोनामुळे भयभीत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहे. अनेकांना लागण झाली आहे. महागाव शहर व तालुका या संकटापासून दूर राहील, अशी स्थिती गेल्या १० दिवसांपर्यंत कायम होती. मात्र मुडाणा येथील सराफा व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यूसुद्धा झाला. त्यामुळे कोरोनाने शहर व तालुक्यात शिरकाव केला.संबंधित सराफा व्यावसायिकाच्या संपर्कातील अन्य चार जणांनासुद्धा कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे महागाव शहराला काटेरी कुंपण लावण्यात आले. आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून कार्यरत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातून नागरिकांना बाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून परिसर सील करण्यात आला. त्या परिसराला आता चक्क बाभळीच्या काट्यांचे कुंपण घालण्यात आले आहे. पिकांच्या संरक्षणासाठी लावले जाणारे कुंपण आता मानवाला घराबाहेर पडू न देण्यासाठी लावले जात आहे. या संकटाने मानवाला खूप काही शिकविले आहे. एकूणच एका अदृश्य विषाणुमुळे अनेक गावे आणि शहरांना आता काटेरी कुंपण घालण्याची वेळ आली आहे. शेताचे कुंपण गावात आल्याने आता नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे.कोरोनाने चित्रच पालटलेआजपर्यंतच्या इतिहासात नागरिकांना घरात बसून राहण्यासाठी शासनातर्फे एवढे कठोर पाऊल कधीच उचलले गेले नाही. मात्र कोरोनाने सर्व चित्रच पालटले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला सहज घेणे, सर्वांनाच महाग पडत आहे. त्याची नागरिकांनासुद्धा जाणीव असणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता काटेरी कुंपणाचा वापर केला जात आहे. अर्थात या काटेरी कुंपणाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा काटेरी कुंपणात न अडकण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे हाच रामबाण उपाय आहे.आपत्तीमधून मानवाने धडा घेण्याची गरजकोरोनाच्या आपत्तीमुळे मानव प्रथमच आपल्याच घरात बंदिस्त झाला आहे. संसर्ग वाढू नये म्हणून शासन व प्रशासनासोबत नागरिकांनाही दक्ष राहण्याची गरज आहे. या आपत्तीने मानवाला निसर्गासोबत एकरूप होवून राहण्याचा धडा दिला आहे. निसर्गाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. सोबतच स्वच्छतेचे पालन करण्याचा धडाही या आपत्तीमधून मिळाला आहे. तो कायम ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या