शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गज आले अडचणीत

By admin | Updated: October 13, 2016 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या ६१ गटांची नव्याने फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अनेक दिग्गजांना फटका बसला.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ६१ गटांची नव्याने फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अनेक दिग्गजांना फटका बसला. त्यांनी आत्तापासूनच पर्यायी मतदार संघाची शोधाशोध सुरू केली आहे.जिल्हा परिषदेत आता ६२ ऐवजी ६१ गट राहतील. नव्याने सहा नगरपंचायती निर्माण झाल्याने सहा गावे वगळून हे गट तयार करण्यात आले आहे. परिणामी काही गावांची गटबदली झाली. पूर्वीच्या मतदार संघातील काही गावे नवीन गटात समाविष्ट झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे गटही नव्याने अस्तित्वात आले आहे. सर्वच गटात थोडाफार बदल झाला आहे. त्यातच आता आरक्षणही बदलले. या बदलामुळे दिग्गजांची मोठी पंचाईत झाली आहे. जिल्हा परिषदेत बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, ययाती नाईक, सुभाष ठोकळ, नरेंद्र ठाकरे, देवानंद पवार, प्रकाश कासावार, मनमोहनसिंग चव्हाण आदी दिग्गज सदस्य आहेत. यापैकी केवळ नरेंद्र ठाकरे यांना आरक्षणाने दिलासा मिळाला. उर्वरित सदस्यांना नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यांचे विद्यमान मतदार संघ आरक्षित झाल्याने दुसरीकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. यात प्रकाश कासावार यांची फारच अडचण झाली. त्यांना जिल्हा परिषदेत पोहोचण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातच जावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)