शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मतदानात ‘नोटा’चा वापर

By admin | Updated: May 18, 2014 23:56 IST

लोकसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने ‘नोटा’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नोटा उपलब्ध झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा

 वणी : लोकसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने ‘नोटा’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नोटा उपलब्ध झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील तब्बल आठ हजार २५७ नागरिकांनी या नकाराधिकाराचा वापर करून उमेदवारांना चपराक लगावली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत मतदारांना ‘नोटा’चा (यापैकी एकही उमेदवार लायक नाही) पर्याय उपलब्ध करून दिला होता. निवडणुकीच्या रिंगणातील एकही उमेदवार मतदाराला लायक वाटत नसल्यास, त्याने ‘नोटा’चे बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली होती. आयोगाच्या या संधीचा चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील तब्बल आठ हजार २५७ मतदारांनी लाभ उठवून आपला मतदानाचा अधिकार बजावला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील राजुरा विधानसभा मतदार संघात एक हजार ७२४, चंद्रपूरमध्ये एक हजार १९५, बल्लारपूरमध्ये एक हजार ४७३, वरोरामध्ये एक हजार ३३७, वणीत एक हजार २0२, तर आर्णी विधानसभा मतदार संघात एक हजार ३२१ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले. तब्बल आठ हजार २५७ मतदारांनी लोकसभा निवडणूक रिंगणातील १८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक नसल्याचे त्यातून दर्शवून दिले. मात्र लाखो मतदारांनी रिंगणातील उमेदवारांच्या पारड्यात मते टाकून ही बाब झिडकारली आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचार्‍यांना आयोगाने पोस्टल बॅलेटचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. हे सर्वच कर्मचारी अर्थात सुशिक्षित आहेत. ते आपल्या पदावर म्हणूनच जबाबदारीने कामही करतात. मात्र पोस्टल बॅलेटने प्राप्त झालेल्या मतांपैकी तब्बल १४५ कर्मचार्‍यांची मते अवैध ठरली आहे. ९८९ कर्मचार्‍यांनी मात्र बरोबर मतदान केले आहे. तब्बल १४५ कर्मचार्‍यांची मते अवैध ठरल्याने आता त्यांच्या सुशिक्षितपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)