शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात युरियाचा काळाबाजार

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यात युरियाची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा कमी असल्याने युरियाचा काळाबाजार सुरू आहे. काही कृषी केंद्र चालक २९८ रुपयांची पावती फाडून प्रत्यक्षात

पुसद : गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यात युरियाची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा कमी असल्याने युरियाचा काळाबाजार सुरू आहे. काही कृषी केंद्र चालक २९८ रुपयांची पावती फाडून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडून ४०० रुपये घेत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकांकडून पिळवणूक होत आहे. कृषी अधिकाऱ्याच्या डोळ्यादेखत हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. युरियाच्या दराविषयी शेतकरी कृषी केंद्र चालकांना विचारतात. परंतु युरियाचा साठाच नसल्याचे ते सांगतात. मात्र वाढीव पैसा दिल्यास तोच युरिया शेतकऱ्यांना दिला जातो. एक दोन पोते युरिया घेणाऱ्या शेतकऱ्याला ४०० रुपये व दहा ते १५ पोते घेणाऱ्याला ३७० रुपये आणि त्यापेक्षा अधिक पोते घेतल्यास ३५० रुपये दराने युरिया विकला जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र कुणीही दखल घेतली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या संघटनाही गप्प बसून असल्याचे शेतकरी सांगत आहे. याबाबत कृषी विक्रेता संघाशी संपर्क साधला असता सध्या युरियाची टंचाई आहे. अमरावती, नांदेड येथून युरिया आणावा लागत आहे. मध्यंतरी पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे युरियाला फारशी मागणी नव्हती. आता पाऊस झाल्याने युरियाची मागणी वाढली आहे. त्यात युरिया साठा कमी असल्याने काही व्यापारी अधिक पैशाची मागणी करीत आहे. परंतु जास्तीत किमतीत कुणीही विकत नाही. ग्रामीण भागातील कृषी केंद्रात अधिक भाव असू शकतो. ३४० पेक्षा अधिक किंमतीत युरिया विकला जात असेल तर कृषी विक्रेता संघटना आणि संबंधित दुकानदाराला तंबी दिली जाईल, अशी मागणी कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष सुधीर पळसकर यांनी सांगितले. तसेच तालुका कृषी अधिकारी कावळे यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात अधिक किमतीत युरियाची विक्री होत असेल तर ते बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी, त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)