शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

नादुरूस्त उभी वाहने धोकादायक

By admin | Updated: October 8, 2015 02:19 IST

शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत.

अपघाताला निमंत्रण : वाहतूक पोलीस, आरटीओंचे जाणीवपूर्वक दुर्लक्षवणी : शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत. ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असून याकडे वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष देऊन वाहने हटविण्याची मागणी होत आहे.साई मंदिर चौकाजवळ असलेल्या एका गॅरेजजवळ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोन नादुरूस्त वाहने उभी आहे. या वाहनांचा वापर होत नसल्यामुळे ते जागेवरच जीर्ण होत आहे. या वाहनांचे नेमके मालक कोण, हेसुद्धा नागरिकांना माहिती नाही. मात्र ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. याच मार्गावर रेल्वे क्रॉसिंगकडे जाताना एका ड्रायव्हींग स्कूलचे नादुरूस्त वाहनही रस्त्याच्या कडेला उभे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ही वाहने दृष्टीसही पडत नाही. रस्त्याच्या अगदी लगतच ही नादुरूस्त वाहने उभी असल्याने कधी मोठा अनर्थ घडेल, याचा भरवसा उरला नाही. नागरिकांना ही नादुरूस्त वाहने दररोज दिसतात. मात्र वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे या वाहनांकडे कसे लक्ष जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ही वाहने अगदी रस्त्याच्या कडेलाच उभी असल्याने अर्धा रस्ताच त्यांनी व्यापून टाकला आहे. परिणामी उर्वरित रस्त्यावरून वाहन चालकांना आपले वाहन समोर काढावे लागते. एखाद्यावेळी समोरून मोठे चारचाकी वाहन समोरासमोर आले की, तेथून मार्ग काढणे कठीण जाते. त्याचबरोबर या उभ्या नादुरुस्ती वाहनांवर दुसरे वाहने आदळू शकतात. या वाहनांवर मात्र आता चोरट्यांची नरज गेली आहे. एका वाहनाचे मागील बाजूचे टायरच गायब झाले आहे. काही सुटे भागसुद्धा चोरीला गेले आहे. या वाहनांचे मालक कोण आहेत, याचासुद्धा कुणाला थांगपत्ता नाही. मात्र ही वाहने जेथे उभी आहेत, त्या परिसरातील नागरिकांना अडचणीची ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)