पांढरकवडा बसस्थानकावर पसरली अस्वछता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:46 IST2021-09-22T04:46:46+5:302021-09-22T04:46:46+5:30

पांढरकवडा शहरात चोरटे सक्रिय पांढरकवडा : शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरावर चोरट्यानी निशाणा साधत चोरी करण्यास सुरुवात ...

Uncleanliness spread at Pandharkavada bus stand | पांढरकवडा बसस्थानकावर पसरली अस्वछता

पांढरकवडा बसस्थानकावर पसरली अस्वछता

पांढरकवडा शहरात चोरटे सक्रिय

पांढरकवडा : शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरावर चोरट्यानी निशाणा साधत चोरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कॉलनी व परिसरात दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने पोलिसांनी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बँकांमध्ये होतेय ग्राहकांची गैरसोय

पांढरकवडा : शहरातील काही शासकीय, निमशायकीय व सहकारी बँकामध्ये महिला, वयोवृद्ध, पेन्शनर आणि दिव्यांग ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. सर्वच ग्राहकांना एकाच रांगेत उभे राहावे लागत असल्याने नाराजीसुद्धा व्यक्त होत आहे. तसेच अनेक बँकात ग्राहकांना धड मार्गदर्शनही केले जात नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज आहे.

Web Title: Uncleanliness spread at Pandharkavada bus stand