शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या निवडणूक बदल्यांसाठी आता २० फेब्रुवारीचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 14:39 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने होऊ घातलेल्या महसूल, पोलीस व ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राज्यांना २० फेब्रुवारीला अल्टीमेटम दिला आहे.

ठळक मुद्देमहसूल, पोलीस व ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राज्यांना २० फेब्रुवारीला अल्टीमेटम दिला.२५ फेब्रुवारीपर्यंत या अधिकाऱ्यांना आपल्या नव्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव नरेंद्र बुटोलिया यांनी ९ फेब्रुवारी रोजी या संबंधीचे आदेश जारी केले.

यवतमाळ -  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने होऊ घातलेल्या महसूल, पोलीस व ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राज्यांना २० फेब्रुवारीला अल्टीमेटम दिला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत या अधिकाऱ्यांना आपल्या नव्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव नरेंद्र बुटोलिया यांनी ९ फेब्रुवारी रोजी या संबंधीचे आदेश जारी केले. पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल्यांसाठी २८ फेब्रुवारी आणि रुजू होण्यासाठी मार्चचा पहिला आठवडा अशी मुदत दिली होती. मात्र त्यात आता बदल करून २० फेब्रुवारीपर्यंत बदल्या व २५ फेब्रुवारीपर्यंत पदभार स्वीकारणे असा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी ७ फेब्रुवारीच तारीख निश्चित केली होती. मात्र सरकारने ही तारीख गांभीर्याने घेतली नाही. पर्यायाने आजही महसूल, पोलीस व ग्रामविकास खात्यातील बीडीओंच्या बदल्या रखडल्या आहेत. 

मंगळवारी २१ उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश तेवढे काढले गेले. आयोगाच्या निकषानुसार विभागीय महसूल आयुक्तांनी बदल्यांचे प्रस्ताव सादर केले. मात्र त्यात राजकीय सोईने फेरबदल करण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय बदल्यांना होणाऱ्या विलंबामुळे व्यक्त केला जात आहे. याच कारणावरून प्रशिक्षणे सुरू होऊनही अद्याप अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याची शक्यता आहे. ऐन आचारसंहितेच्या तोंडावर अधिकारी रुजू होऊ नये, त्याला आपल्या मतदारसंघातील भौगोलिक, राजकीय स्थिती, मनुष्यबळ याचा अभ्यास व्हावा म्हणून किमान १५ ते २० दिवस मिळावे, अशी मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांची भूमिका होती. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. ते पाहता २००९ ची नामांकनाच्या एक दिवस आधी रुजू होण्याच्या नामुष्कीची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळElectionनिवडणूक