ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा, दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 23:49 IST2021-12-30T23:48:35+5:302021-12-30T23:49:31+5:30
महागाव (जि. यवतमाळ ) : ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महागाव उमरखेड रस्त्यावर ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा, दोघांचा जागीच मृत्यू
महागाव (जि. यवतमाळ) : ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महागाव उमरखेड रस्त्यावर असलेल्या मातोश्री शाळेसमोर गुरूवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची भीषणता एवढी होती की ट्रकने मोटरसायकलला जुन्या बस स्थानकापर्यंत फरफटत नेले.
ओम सोळंके (रा. पोहंडुळ) आणि शंतनु माटाळकर (रा. करंजखेड) अशी अपघातामधील मृतकांची नावे आहेत. हे दोघे मोटरसायकलने जात असताना ट्रकने त्यांना ठोकरले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विलास चव्हाण तसेच गावातील नागरिक गणेश भोयर ,संतोष जाधव, आकाश पानपट्टे, तेजस नरवाडे, अमोल गावंडे आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच अपघात झाल्याचे समजल्यानंतर पोंहडुळ आणि करंजखेड येथील नागरिक घटनास्थळाकडे निघाले होते. ट्रक चालक विश्वंभर डोंबरे हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. सदर ट्रक लातूरवरून तुर घेऊन नागपूर करिता निघाला होता.