शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठागौरी भक्तांना दोन टन मोफत भाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या मिळाव्या म्हणून पहाटपासूनच भक्तांची लांबच लांब रांग लागली होती.

ठळक मुद्देभाजीमंडी मित्रपरिवाराचा उपक्रम : ग्रामीण भागातील नागरिकांनी नोंदविली उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मीच्या पर्वावर लागणाऱ्या १६ भाज्या मिळविण्यासाठी भक्तांची प्रचंड फरपट होते. याचाच फायदा घेत भक्तांकडून अवास्तव पैसे आकारून भाज्यांची विक्री होत होती. याला आवर घालण्यासाठी भाजीमंडी मित्र परिवाराने १६ भाज्या मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी १५ टन भाज्या मोफत वाटण्यात आल्या. यामुळे शेकडो भक्तांचा आर्थिक भार कमी झाला.यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या मिळाव्या म्हणून पहाटपासूनच भक्तांची लांबच लांब रांग लागली होती. त्यांना भाजीचे वितरण करण्यात आले.याशिवाय महाप्रसादाकरिता लागणारी भाजी ५० टक्के कपात करून विकण्यात आली. सर्व मिळून १३ टन भाज्यांची विक्री झाली. उत्सवात तुटवडा पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात भाजी मागविण्यात आली होती. भाजी मंडी मित्र परिवाराचे अध्यक्ष दिनेश मुराब, उपाध्यक्ष सुधीर चुट्टे, प्रकाश कैथवास यांच्यासह १५० भाजी विक्रेते, भाजी व्यावसायिकांची चमू या उपक्रमासाठी झटली. या उपक्रमाचे येथे स्वागत करण्यात येत आहे.गोविंदा फाउंडेशनने दिले हार व पूजा साहित्यगौरी पुजनाला हार अवास्तव दराने विकले जातात. यात भक्तांना आर्थिक भुर्दंड बसतो. यामुळे गोविंदा फाउंडेशनने पूजा साहित्य आणि हार वितरणाचा निर्णय घेतला. स्टेट बँक चौकात गौरी आराधनेसाठी हार आणि पूजा साहित्य वितरीत करण्यात आले. ५०१ भक्तांना साहित्य पुरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश गोगरकर, अशोक पद्मावार, सागर कंचलवार, मिलिंद मुंजाळ, विवेक ठेंगरे, देविदास अराठे, नीलेश गंधे, संजय येरावार, संदीप येरावार, अतुल कपिले, नीलेश नारसे, जग्गू टोंपे, छोटू सवई, वैशाली सवई, संजय पिसाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :vegetableभाज्या