शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

पत्नीशी झालेल्या वादात एका क्रुरकर्मा पित्याने आपल्या दीड वर्षीय पोटच्या गोळ्याला जमिनीवर आदळून ठार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पांढरकवडापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने पंचक्रोशी हादरून गेली आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा, महागाव तालुका : गणेशपूर येथे पित्याने बालकाला आपटले

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा/हिवरा-संगम : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बापाने दीड वर्षीय मुलाचा तर १६ वर्षीय मुलाने बापाचा खून केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांनी जिल्हा हादरून गेला. पहिली घटना पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर येथे तर दुसरी घटना महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे घडली.पत्नीशी झालेल्या वादात एका क्रुरकर्मा पित्याने आपल्या दीड वर्षीय पोटच्या गोळ्याला जमिनीवर आदळून ठार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पांढरकवडापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने पंचक्रोशी हादरून गेली आहे.सावन पिंटू चव्हाण असे मृत बालकाचे नाव आहे, तर पिंटू सुधाकर चव्हाण असे क्रुरकर्मा पित्याचे नाव आहे. रविवारी रात्री पिंटू चव्हाण हा नेहमीप्रमाणे दारू पिवून बेड्यावर आला. त्याची पत्नी सैनीबाईने त्याला जेवणाबद्दल आग्रह केला. याच कारणावरून दोघात वाद सुरू झाला. या वादात पिंटू चव्हाणने पत्नी सैनीबाईला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्याकडेवर असलेल्या दिड वर्षीय सावनला हिसकावून तो पारधीबेड्या लगतच्या एका शेतात गेला. तेथे त्याने चिमुरड्या सावनला जमिनीवर आदळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात निरागस सावनचा जागीच मृत्यू झाला. पिंटू चव्हाण एवढ्यावरच थांबला नाही, तर तीन वर्षीय मोठा मुलगा शिवम यालाही त्याने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच, पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे, वसंत चव्हाण व नाईकवाडे हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी पिंटू चव्हाणला ताब्यात घेतले. चिमुरड्या मुलाला अतिशय क्रुरपणे ठार मारण्याच्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचाया प्रकरणातील आरोपी पिंटू चव्हाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याला एका खूनप्रकरणातदेखील अटक करण्यात आली होती, अशी माहिती त्याची पत्नी सैनीबाई हिने पोलिसांना दिली. ही खुनाची घटना आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दी काही वर्षांपूर्वी घडली होती, असे सांगण्यात येते.हिवरासंगममध्ये मोबाईल फोडल्यावरून पित्याला संपविलेदुसऱ्या घटनेत हिवरासंगम येथे मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मुलगा १६ वर्षाचा असल्याने विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून त्याच्याविरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विधीसंघर्षग्रस्त बालक हा गावातीलच ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या हाताला काम नव्हते, यावरूनच वडील सतत त्याला काही कामधंदा करीत नाही, मोबाईलवर खेळत राहतो असे टोमणे मारत होते. यातूनच दोघा बापलेकात वाद पेटला. वडिलाने रागाच्या भरात घरात चार्जिंग लावलेला मोबाईल फोडला. हे पाहून मुलाने थेट वडिलाला मारायला सुरुवात केली. हाणामारी करीत असतानाच मुलाच्या हातात खाटेचा ठावा लागला. त्याने त्या ठाव्यानेच वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळून वडिलाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या काकाला माहीत झाला. त्यांनी तातडीने धाव घेऊन मुलाच्या तावडीतून वडिलाची सुटका केली. तो काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता, शेवटी विधीसंघर्षग्रस्त बालकाला दोरीने खांबाला बांधून ठेवले. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण कदम यांना दिली. त्यांनी महागाव ठाणेदारांना या घटनेबाबत सांगितले. महागाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. मुलगा व वडील दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे.वडिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्नमोबाईल फोडल्याचा राग आल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलाला डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या वडिलाला तुराट्याच्या गंजीवर ठेऊन पेटवून देण्याच्या तयारीत विधीसंघर्षग्रस्त बालक होता. तो मधात आलेल्या काकालाही जुमानत नव्हता. अखेर त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने खांबाला बांधून ठेवले. झटापटीत त्याला वेळेवर आगपेटी मिळाली नाही. त्यामुळे वडिलाला अर्धमेल्या अवस्थेत जाळता आले नाही. मात्र डोक्यावर गंभीर जखम झाल्याने वडिलांचा काही क्षणातच मृत्यू झाला.

टॅग्स :Murderखून