शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस-दुचाकी अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

ते आपल्या दुचाकीने (एम.एच.२९/बी.एम. ४२३४) परत जात असताना, पुसद बायपास मार्गावर समोरून येणाऱ्या परभणी आगाराच्या एसटी बसने (एम.एच.२०/बी.एल.२५२७) त्यांना धडक दिली. दुचाकी चालकांसह त्यांचे दोन मित्रही दुसऱ्या दुचाकीने (एम.एच.३८/वाय.६४३९) देवनगरला जात होते. दोनपैकी एका दुचाकीने बसला मागून धडक दिली. दुसरी दुचाकी बसवर समोरासमोर आदळली. बसला मागून धडक देणाऱ्या दुचाकीवरील पवन गावंडे व रवी पुंड यांचा जागीच मृत्यू झाला. 

ठळक मुद्देदिग्रसची घटना : युवक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दिग्रस ते पुसद बायपास मार्गावर एसटी बस व दोन दुचाकींचा अपघात झाला. यात दोन युवक जागीच ठार, तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पवन मुलसिंग गावंडे (२०) आणि रवि रमेश पुंड (२१) दोघेही रा.देवनगर दिग्रस अशी मृतांची नावे आहे. हे दोघे स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन आपल्या गावी देवनगरला जात होते. ते आपल्या दुचाकीने (एम.एच.२९/बी.एम. ४२३४) परत जात असताना, पुसद बायपास मार्गावर समोरून येणाऱ्या परभणी आगाराच्या एसटी बसने (एम.एच.२०/बी.एल.२५२७) त्यांना धडक दिली. दुचाकी चालकांसह त्यांचे दोन मित्रही दुसऱ्या दुचाकीने (एम.एच.३८/वाय.६४३९) देवनगरला जात होते. दोनपैकी एका दुचाकीने बसला मागून धडक दिली. दुसरी दुचाकी बसवर समोरासमोर आदळली. बसला मागून धडक देणाऱ्या दुचाकीवरील पवन गावंडे व रवी पुंड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील केशव प्रल्हाद चव्हाण (३६) रा.श्रीराम विहार दिग्रस गंभीर जखमी झाला. त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच, ठाणेदार सोनाजी आमले, एपीआय धीरेंद्रसिंग बिलवाल व पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी बसचालक संतोष किसन सातोडे (३७) रा.परभणी याला अटक केली. ही बस परभणी येथून चंद्रपूरकडे जात होती.

देवनगरवर शोककळामृत रवी पुंड आणि पवन गावंडे हे दोन्ही तरुण देवनगर परिसरातील रहिवासी होते. दोघांच्याही मृत्युमुळे या परिसरात शोकाकुल वातावरण होते. दुपारी घटना घडल्याचे समजताच या परिसरातील अनेक नागरिकांनी पुसद बायपासकडे धाव घेतली होती. तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही युवकांचे चिरडलेले मृतदेह बघून नागरिकांना दु:ख अनावर झाले होते.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू