शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक फसल्याने पाच लाखांचे सागवान टाकून तस्कर पसार

By admin | Updated: July 18, 2014 00:20 IST

परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सात घनमीटर लाकूड तस्करी करण्याच्या बेतात असताना ट्रक पंक्चर होवून दगडात फसला. त्यामुळे तस्कर ट्रक तेथेच

सुधाकर अक्कलवार - घाटंजीपरिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सात घनमीटर लाकूड तस्करी करण्याच्या बेतात असताना ट्रक पंक्चर होवून दगडात फसला. त्यामुळे तस्कर ट्रक तेथेच सोडून पसार झाले. ही घटना इंजाळा शिवारात उघडकीस आली. मात्र कारवाईच्या भीतीने आता वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे. घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा वन वर्तुळातील इंजाळा येथील वनजमिनीवरील सुमारे ८० सेमीच्यावर गोलाई असलेल्या ३४ सागवान वृक्षांची एका रात्रीतून तस्करांनी कत्तल केली. त्यानंतर सुमारे सात घनमीटर सागवान लाकूड ट्रकद्वारे तस्करी करण्याच्या बेतात असताना त्यांचा ट्रक (क्र. एमएच-२०-एटी-३७४५) पंक्चर होवून दोन मोठ्या दगडांमध्ये फसला. ट्रक बाहेर काढण्यासाठी तस्करांनी सुमारे अडीच घनमीटर सागवान लाकूड बाहेर फेकले तरीही ट्रक चिखलाबाहेर निघाला नाही. त्यामुळे भीतीपोटी तस्करांनी ट्रक आणि सागवान लाकूड सोडून पोबारा केला. ही बाब सकाळी घराबाहेर पडलेल्या एका वनचौकीदाराच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन. मन्साळ यांना दिली.या गंभीर घटनेची माहिती मिळताच साखर झोपेत असलेले वनाधिकारी आणि कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. या वेळी ट्रक आणि जमिनीवर पडून असलेल्या सागवानाचा पंचनामा करून ट्रकसह लाकूडसाठा जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात परिपक्व सागवान वृक्षांची तस्करी झाल्याने कारवाई ओढवेल, अशी भीती वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होती. त्यामुळे ही घटना उघडकीस आणणाऱ्या वन चौकीदाराला समज देत कारवाईचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाचे एसीएफ ए.एन. सोनकुसरे, घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन. मन्साळ यांनी रेकॉर्डवर वेगळेच दर्शविले. त्यामध्ये तस्कर लाकूडसाठा घेऊन पसार होत असताना वन पथकाने त्यांचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक आणि सागवान लाकूडसाठा जंगलात सोडून तस्कर पसार झाल्याचे सांगण्यात आले. वर्षभरापूर्वी साखरा वनवर्तुळ आणि इंजाळा येथील वनजमिनीवरून मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली. त्यावेळी तो लाकूडसाठा बेवारस दर्शवून प्रकरणाला वेगळी कलाटणी दिल्या गेली. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचेही त्यामध्ये पितळ पिवळे झाल्याने मोठे प्रकरण दडपल्या गेले. आता इंजाळा येथील वृक्ष कत्तल आणि तस्करी संदर्भात वरिष्ठ वनाधिकारी काय दखल घेतात, याकडे लक्ष लागले आहे.