शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये टरबुजाच्या पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.

ठळक मुद्देउत्पादक चिंतेत : आधीच उठाव नाही, त्यात सडण्याचीही भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : टरबुजाचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या प्रयत्नात असलेले तालुक्यातील उत्पादक चिंतेत सापडले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात टरबूज विकण्यासाठी जाऊ देत नाही, तर दुसरीकडे पावसामुळे सडण्याची भीती आहे. या उत्पादनावर आलेली संक्रांत दूर व्हावी यासाठी प्रशासनाकडूनच सहकार्याची साथ अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी अटकाव केला जाऊ नये, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र याठिकाणी या विपरित परिस्थिती आहे. बाजारात उभे राहिल्यानंतर खरेदीदार येतात. परंतु शहरात जायचे कसे, हा प्रश्न आहे. शेतात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठीचे टरबूज तयार झाले आहे. अशातच पावसाची हजेरी लागत आहे. या अस्मानी संकटामुळेही टरबूज उत्पादक हवालदिल झाला आहे.तालुक्यात जवळपास ४० हून अधिक शेतकºयांनी टरबुजाची शेती केली आहे. उत्पादन अधिक, बाजारात माल न्यायची सोय नाही या व इतर कारणांमुळे किंमतही अतिशय कमी मिळत आहे. यामुळे हजारो टन टरबूज सडण्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाऊ रकमा काढून टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. या पिकाचा पैसा होत नसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी, याची चिंता सतावत आहे.भरून न निघणारे नुकसानयावर्षी टरबूज पिकाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील तेजेस सिंगवी, संग्राम देशमुख, ओम दिनेश ढवक आदी युवा शेतकऱ्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. संचारबंदीमुळे त्यांना आपला माल परत आणावा लागला. याशिवाय इतरही शेतकऱ्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले.