शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी उचलले रस्त्यावरील मृत श्वान!

By admin | Updated: October 14, 2015 02:55 IST

शासनाने स्वच्छतेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. अनेक जण यात केवळ फोटोपुरता स्वच्छतेचा कांगावा करताना दिसत आहे.

स्वच्छतेचा मापदंड : नागरिक बघतच राहिलेनेर : शासनाने स्वच्छतेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. अनेक जण यात केवळ फोटोपुरता स्वच्छतेचा कांगावा करताना दिसत आहे. परंतु, नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी रविवारी भरस्त्यात मृतावस्थेत पडलेला श्वान स्वत: उचलून स्वच्छतेचा नवा मापदंड घालून दिला.नेर-अमरावती मार्गावर एका श्वानाला भरधाव ट्रकने धडक दिली. यात श्वान ठार झाले. हे श्वान तेथेचे पडून होते. जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही त्याचा त्रास होत होता. मात्र, कुणीही पुढे येऊन त्या श्वानाला बाजूला करत नव्हते. रविवार असल्याने नगरपरिषदेचे कर्मचारी हजर नव्हते. त्याच वेळी नगराध्यक्ष पवन जयस्वाल त्या रस्त्याने दुचाकीने निघाले होते. त्यांनी या श्वानाला पाहताच दुचाकी बाजूला उभी केली. स्वत: ते मृत श्वान रस्त्याच्या बाजूला केले. हा प्रकार पाहणारे नागरिकही क्षणभर वरमले. नगराध्यक्ष स्वत: स्वच्छता करू शकतो, तर आपण का करू नये, ही भावना अनेकांच्या मनात घर करून गेली.शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगर परिषद प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना सर्वसामान्य जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची तेवढीच गरज आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. तब्बल तीन तास मृत श्वान रस्त्यावर पडून असतानाही कुणीच त्याला बाजूला केले नाही. शेवटी शहराच्या प्रथम नागरिकानेच जबाबदारी घेतली. जोपर्यंत प्रत्येक नागरिक ‘मी’पणा सोडणार नाही, तोपर्यंत स्वच्छतेचे अभियान गतिमान होणार नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)