वणी उपविभागात व्याघ्र हल्ले सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:13+5:30

मृत गोऱ्हे दहेगाव येथील रामदास घुगूल यांच्या मालकीचे होते, तर जखमी गोऱ्हा मोहन घुगूल यांच्या मालकीचा आहे. जखमी गोऱ्हाही मृत्यूशी झुंज देत आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tiger attacks continue in Wani subdivision | वणी उपविभागात व्याघ्र हल्ले सुरूच

वणी उपविभागात व्याघ्र हल्ले सुरूच

googlenewsNext
ठळक मुद्देघोन्सात दोन गोऱ्हे ठार : मारेगावात चार पाळीव जनावरांचा पाडला फडशा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात व्याघ्र हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. वणी तालुक्यातील घोन्सा शेतशिवारातील जुनोनी गावाजवळ
चराईसाठी गेलेल्या दोन गोºह्यांवर वाघाने हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले, तर या हल्ल्यात एक गोºहा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
मृत गोऱ्हे दहेगाव येथील रामदास घुगूल यांच्या मालकीचे होते, तर जखमी गोऱ्हा मोहन घुगूल यांच्या मालकीचा आहे. जखमी गोऱ्हाही मृत्यूशी झुंज देत आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे वन्यप्राण्याने पाळीव जनावरांवर हल्ला करून चार जनावरे ठार केल्याची घटना बुधवारी घडली. आतापर्यंत या परिसरात वन्यप्राण्यांनी १५ जनावरे ठार केली असून नागरिकांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे, तर वनाविभाग हा वाघ नसून तडस असल्याचे सांगत आहे.
मार्डी परिसरात वनविभागाचे हजारो हेक्टरवर फिस्कीचे जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु हिंस्त्र प्राण्याचे हल्ले झाल्याचा घटना घडल्या नाही. परंतु गेल्या काही महिन्यापासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. आतापर्यंत जवळपास १५ प्राळीव प्राणी या हल्ल्यात ठार झाले. पांढरकवडा (पिसगाव) येथील अक्षय गोल्हर, विलास गोल्हर, रमेश जांभुळकर या शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वन्यप्राण्याने हल्ला केला.
या घटनेने नागरिकांत दहशत पसरली असून अनेक नागरिक हा हल्ला वाघाने केल्याचे सांगत आहेत. हल्लेखोर वाघाला पाहिल्याचा दावा अनेकजण करीत आहेत. वनविभाग मात्र हे सर्व हल्ले वाघाचे नसून तडसाचे असल्याचे सांगत आहे. तडस हा प्राणी मानवावर हल्ला करीत नाही. शेतात बांधून असलेल्या जनावरांवर हल्ले करतो, असे सांगितले जाते. वनाविभाग आणि नागरिक आपआपल्या दाव्यावर ठाम आहेत. नागरिकांमधील दहशत बघता वनविभागाने हल्लेखोर प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

पठारपूरमध्ये वाघाचा वावर, दहशत कायम
गेल्या काही महिन्यांपासून वणी तालुक्यातील सुकनेगाव, मोहोर्ली, पळसोनीसह विविध भागात वाघाचा वावर होता. अलिकडे पठारपूर परिसरात वाघांच्या हालचाली दिसून आल्या. त्यामुळे या भागात वाघाची दहशत कायम आहे.

Web Title: Tiger attacks continue in Wani subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ