शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशेवर आरोपी विविध गुन्ह्यात पसार

By admin | Updated: September 17, 2014 00:01 IST

खून, दरोडे, प्राणघातक हल्ला, वाटमारी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३५२ आरोपी जिल्हाभरातून पसार आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देवून वर्षानूवर्षे हे आरोपी

पोलिसांच्या हातावर तुरी : १७ वर्षांपासून फरारीचा रेकॉर्ड सतीश येटरे - यवतमाळखून, दरोडे, प्राणघातक हल्ला, वाटमारी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३५२ आरोपी जिल्हाभरातून पसार आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देवून वर्षानूवर्षे हे आरोपी ओळख लपवून समाजात वास्तव्य करीत आहे. यातील काही आरोपींनी तर पसार राहण्याचा रेकॉर्डच केला आहे. एक आरोपी तब्बल १७ वर्षांपासून पसार असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे, हे विशेष! असे असले तरी पसार आरोपींचा फुगत चाललेला आकडा बघता पोलीस त्यांच्यापुढे दिवसेंदिवस हतबल होत चालल्याचे दिसून येत आहे. शरीर दुखापतीच्या आणि संपत्तीविषयक गुन्ह्यात जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंद असलेले तब्बल ३५२ आरोपी पसार असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. त्यापैकी २६३ आरोपींची फरार, तर ८९ आरोपींची पाहिजेत या सदराखाली नोंद घेण्यात आली आहे. कुठलीही गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करतात. त्यानंतर मात्र जामीन मिळताच हे आरोपी शिक्षेच्या भितीने पसार होतात. आरोपी अनुपस्थित असल्याने न्यायप्रविष्ट खटलेही प्रलंबित राहतात. अनेकदा समन्स बजावूनही आरोपी हजर होत नाही. वॉरंट निघाल्यानंतर पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेतात. मात्र शोध घेवून तो हाती लागत नाही. तेव्हा अनेकदा पोलिसांना न्यायालयाच्या संतापालाही सामोरे जावे लागते. दुसरीकडे एखाद्या गंभीर घटनेला मूर्तरूप देवून वर्षानूवर्षे पसार राहण्याचा ट्रेंड सध्या गुन्हेगारांमध्ये आहे. घटनेशी संबंधित पुरावे गोळा करून आणि तपास पूर्ण करून पोलिसांना ९० दिवसाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावी लागते. तोवर आरोपीला अटक करण्यात अथवा पुरावे गोळा झाले नाही तर अनेकदा पोलीस न्यायालयाला विनंती करून अतिरिक्त अवधी मागते. परंतु वारंवार अवधी वाढवून मिळत नाही. ही पोलिसांची खरी अडचण असली तरी, गुन्हेगारांना मात्र ९० दिवसाच्या नंतर म्हणजेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयात आत्मसमर्पण केल्यास लवकर जामीन मिळतो. तसेच दोषारोपपत्रात तांत्रिक अडचणी राहून खटल्यातून निर्दाेष मुक्तता होते, असा गैरसमज गुन्हेगारांमध्ये आहे. त्यामुळे भितीतून नव्हे तर गैरसमजूतीतूनही अनेक आरोपी पसार आहेत. काही आरोपी हे सराईत असल्याने कारागृहात असताना इतर गुन्हेगारांशी झालेल्या ओळखीतून आणि त्यांच्याच आधाराने ते परजिल्ह्यात वास्तव्याला आहेत. पोलीस दफ्तरी पसार म्हणून नोंद असलेले अनेक आरोपी वर्षानूवर्षे पसार आहेत. त्यातील एक आरोपी तर तब्बल १७ वर्षांपासून फरार आहे. पसार आरोपी हे मूळगाव आणि ठिकाण सोडून समाजात वास्तव्याला आहेत. त्यासाठी ते आपली ओळख लपवतात. त्यामुळे पसार आरोपींचा आकडा वाढताच आहे. याउलट पोलिसांची यंत्रणा तोकडी आणि कुचकामी ठरत असल्यानेही काही आरोपी पसार असल्याचे सांगण्यात येते. काही आरोपी हे पोलिसांच्या हालचालींवर बारिक नजर ठेवत असल्याने ते हाती लागत नाहीत, हेसुद्धा या पसार आरोपींची जमेची बाजू आहे.