शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात २ ठार, १६ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:53 IST

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर १६ जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देयवतमाळ, पुसदमधील तरुण : देवधरी घाटात मजुरांचा आॅटोरिक्षा ट्रकला धडकला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर १६ जण गंभीर जखमी झाले. मजुरांना घेऊन जाणारा आॅटोरिक्षा देवधरी घाटात उभ्या ट्रकवर आदळून १४ जण जखमी झाले. यवतमाळ शहरानजीकच्या मडकोना परिसरात दुचाकी अपघातात सफाई कर्मचारी तर पुसद तालुक्यातील भोजला येथे मोटरसायकल झाडावर आदळून एक जण ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाले.पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथून मजुरांना घेऊन आॅटोरिक्षा चाचोरा येथील शेताकडे रविवारी सकाळी जात होता. राष्टÑीय महामार्ग क्र. ७ वरील देवधरी घाटात उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकवर हा आॅटोरिक्षा आदळला. अपघात एवढा भीषण होता की, आॅटोरिक्षाने दोन-तीन पलट्या मारल्या. त्यामुळे आॅटोरिक्षातील १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यात सुरेश आडे (३५), सकुबाई चव्हाण (५१), कैलास मडावी (६५), रेणुका प्रकाश कन्नाके (४५), कल्पना विजय मडावी (३५), धु्रपदाबाई महादेव कोवे (६०), लिलाबाई राठोड (६०), रेणुका राठोड (३५), कविता चव्हाण (३५), तानेबाई विलास वडे (४०), कल्पना किशोर मोरेवार (३०), रेखा राठोड (३५), रशिदा रऊफ शेख (५०), उद्धव राठोड (६५) यांचा समावेश आहे. जखमींना प्रथम करंजी व नंतर यवतमाळ व सावंगी मेघे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या अधिवेशनाला जाणाºया कर्मचाºयांनी अपघातग्रस्तांना मदत केली.यवतमाळ-नागपूर मार्गावरील मडकोना घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन सफाई कर्मचारी ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. उमेश रामचरण तुरतेले (३२) रा. गोधनी रोड, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. तो येथील अमोलकचंद महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. सकाळी यवतमाळवरून हिंगणघाटकडे दुचाकीने जात होता. मडकोना घाटात नियंत्रण सुटल्याने पायी येत असलेल्या विठ्ठल लक्ष्मण राऊत (५९) याला दुचाकीची धडक देऊन तो रस्त्यावर आदळला. त्यात गंभीर जखमी होऊन उमेशचा जागीच मृत्यू झाला. जखमीला यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिसरा अपघात पुसद तालुक्यातील भोजला शिवारात घडला. भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने भगवान नामदेव कांबळे (२७) रा. भोजला हा जागीच ठार झाला. तर सचिन संजय खंदारे (२४), संतोष नारायण गायकवाड (३०) हे गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे तिघे पिंपळगावकडे जात होते. एका वळणावर दुचाकी झाडावर आदळल्याने अपघात झाला. जखमींना पुसद रुग्णालयात दाखल केले.