शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१०० मीटरमध्ये तीन बंधारे

By admin | Updated: July 22, 2014 00:05 IST

एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर

ठाणेगाव : कृषी विभागाच्या धोरणामुळे शासनाच्या निधीला चुनाअब्दुल मतीन - पारवाएखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर केवळ १०० मीटरमध्ये तीन सिमेंट बंधारे बांधले. या विभागाने सदर गावावर एवढी ‘उदारता’ दाखविण्यामागे काय कारण असावे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ठाणेगाव या छोट्याशा गावातून दोन नाले वाहतात. यापूर्वी एका नाल्यावर दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांचा उपयोग किती होतो याची माहिती या विभागाला नाही. एवढ्यावरच हा विभाग थांबला नाही तर दुसऱ्या एका नाल्यावर केवळ १०० मीटर अंतरात तीन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. जंगलाला लागून वाहणाऱ्या या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा उपयोग किती शेतकऱ्यांना होईल याचा कुठलाही हिशेब या विभागाकडे नाही. मात्र बंधारे बांधून केवळ शासनाच्या निधीला चुना लावला गेला. या विभागाने बंधारे बांधले हे खरे मात्र त्याचा दर्जा तपासण्याची तसदी कुणीही घेतली नाही. या कामासाठी सिमेंटचा वापर अत्यल्प करण्यात आला. रेतीही नाल्याची उपयोगात आणली. बांधकाम झाल्यानंतर पाण्याचा आवश्यक तेवढा वापर झालेला नाही. परिणामी या बंधाऱ्याच्या आयुष्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शासनाचे हजारो रुपये या कामावर खर्च करण्यात आले. त्याची उपयोगिता अद्याप स्पष्ट झाली नसली तरी निकृष्ट काम झाले, हे मात्र अनेक बाबींवरून दिसून येते. त्यामुळे या बंधाऱ्याच्या निर्मितीचा उद्देश नेमका काय असावा, हा प्रश्न कायम आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी चौकशी केल्यास अनेक बाबी पुढे येऊ शकतात. या दृष्टीने परिसरातील लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न लावून धरण्याची गरज आहे.