शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नेर शहरात लॉकडाऊनमध्येही चोरट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM

दोन दिवसात नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फुटली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलून नेला. तेलाचे पिपे, किराणा माल चोरटे खरेदी केल्याप्रमाणे अंगाखांद्यावरून घेऊन जातात. ही बाब सर्वांनाच धक्का देणारी आहे. राजरोसपणे चोरी करण्याचे बळ या चोरट्यांकडे आले कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून धडक कारवाईची अपेक्षा : सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिनधास्त वावरताना दिसतात चोरटे

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मध्यरात्रीनंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडावे, अशा पद्धतीने चोरटे नेरच्या बाजारपेठेत फिरत आहेत. एक-दोन नव्हे तर २०-२५ जणांचा जत्था बाजारपेठेतील दुकानांना लक्ष्य करत असल्याचे दिसून येते. चोरट्यांची संपूर्ण हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून त्यांना कुणाचेही भय नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्री दुकान फुटले की नाही हे पाहण्यासाठी दिवसा व्यापारी घराबाहेर पडत आहे.दोन दिवसात नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फुटली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलून नेला. तेलाचे पिपे, किराणा माल चोरटे खरेदी केल्याप्रमाणे अंगाखांद्यावरून घेऊन जातात. ही बाब सर्वांनाच धक्का देणारी आहे.राजरोसपणे चोरी करण्याचे बळ या चोरट्यांकडे आले कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने चोर रस्त्यावर फिरत असताना बंदोबस्त व पेट्रोलिंगचे पोलीस करतात काय, यावरही संशय व्यक्त होत आहे. सब्बल, सळाख यासारख्या साहित्याच्या आधारे शटरचे कुलूप तोडून किंवा शटर वाकवून चोरी होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्ट दिसूनही त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. शहरातील अमरावती रोडवर शेखर मालानी आणि भिकेश मालानी यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरी झाली. या चोरीच्या पद्धतीने ही टोळी एकच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळ शहरातही अशाच पद्धतीने दुकान फोडण्याच्या घटना सातत्याने घडल्या होत्या. अद्यापपर्यंत पोलीस या चोरट्यांचा सुगावा लावू शकलेले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.चोरट्यांची टोळी हाती लागत नाही तोपर्यंत हा तपास सोडू नये. सध्या व्यापारी वर्ग लॉकडाऊनमुळे घरी बसून आहे. मात्र त्यांची दुकाने व लाखोंचा मुद्देमाल बाजारात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.

टॅग्स :Thiefचोर