शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे बँकेत अन् पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्यातील थोडीबहुत रक्कमच चोरट्यांनी नेली. पुन्हा रक्कम नेण्याच्या लालसेने पाच जण बँकेत शिरले. यावेळी त्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे स्पष्ट कैद झाले आहेत. मात्र चेहरा पूर्णपणे झाकला असल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इंदिरा गांधी मार्केटमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दोन दिवसांत चारदा चोरटे शिरले. २० मेच्या रात्री पोलीस गस्तीचे वाहन बँकेच्या रस्त्यावर असताना चोरटे बँकेत रोख रक्कम शोधताना दिसून आले. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे गस्तीवरच्या पोलिसांना आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ काही संशयित दिसतात. त्यांना हटकून पोलीस वाहन पुढे निघून गेले. नंतर चोरीचा प्रयत्न झाला. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्यातील थोडीबहुत रक्कमच चोरट्यांनी नेली. पुन्हा रक्कम नेण्याच्या लालसेने पाच जण बँकेत शिरले. यावेळी त्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे स्पष्ट कैद झाले आहेत. मात्र चेहरा पूर्णपणे झाकला असल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य नाही. दुसऱ्यांदा बँकेत आलेल्या चोरट्यांना हाती एक रुपयाही लागला नाही. त्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागले. २० मेच्या रात्री दोन वाजता पोलीस गस्तीचे वाहन आझाद मैदान प्रवेशद्वारावर आले. तेथे तीन ते चार जणांचे टोळके त्यांना दिसले. या टोळक्याला गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी हटकले व वाहन पुढे निघून गेले. त्यानंतर पाच जण बँकेत शिरले. हे काही मिनिटांच्या अंतरानेच घडले. नंतर पोलीस गस्तीचे वाहन पुन्हा त्याच चौकात आले. त्यावेळी चोरटे बँकेत रोख रकमेचा शोध घेत होते. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आला आहे. यातून पोलिसांच्या रात्रगस्तीचा फोलपणा उघड झाला आहे. रात्री २ वाजता संशयित दिसल्यानंतर त्यांना हटकून सोडून का दिले, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना रात्रगस्त अशा पद्धतीने घातली जात असेल तर चोरट्यांचे फावणारच    आहे. 

सुरक्षेकडे बॅंक प्रशासनाचेही होतेय दुर्लक्ष- बँकेतून चार लाख ४० हजारांची रोख रक्कम चोरीस गेल्यानंतरही महाराष्ट्र बँकेच्या या शाखेतील सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. साधा चौकीदारही बँकेपुढे रात्रपाळीत ठेवण्यात आला नाही. त्यावरून बँकसुद्धा त्यांच्याकडे असलेल्या नागरिकांच्या रोख रकमेबाबत फारशी गंभीर नसल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Thiefचोरbankबँक