शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड योजनेचा हिशेबच नाही

By admin | Updated: April 20, 2015 00:14 IST

ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दीसह इतर योजनेतून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

गणना कागदावरच : कळंब तालुक्यात वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्चकळंब : ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दीसह इतर योजनेतून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही गावागावात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक वनिकरण आणि वनविभागही यात मागे नव्हता. परंतु आता लावलेली वृक्षच गायब झाल्याची ओरड होत आहे. मात्र किती वृक्ष लावण्यात आली आणि किती जिवंत आहेत, हे सांगायला कोणीही तयार नाही. वृक्ष लागवडीसाठी किती निधी वापरण्यात आला आणि प्रत्यक्ष किती वृक्ष जिवंत आहे, हे वृक्षगणनेनंतर उघड होते. परंतु त्यालाही हरताळ फासला गेला. ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेतून लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र जिवंत वृक्षांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने वृक्षगणना करण्याचे ठरविले आहे. परंतु ही गणना कागदावरच असल्याचे स्पष्ट होते.जणगणना, पशुगणनेच्या धर्तीवर वृक्षगणना केली जाणार होती. ही जबाबदारी ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आली. परंतु ती प्रामाणिकपणे पाळली गेली नाही. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने पर्यावरण विकासावर भर दिलेला आहे. यासाठी पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजना, लोकसंख्येच्या प्रमाणात कर वसुली, प्लास्टिकमुक्त गाव, लोकसंख्येच्या ५० टक्के वृक्षारोपण, ७० टक्केच्यावर करवसुली, पाणीपट्टी वसुली, गोबरगॅस, घनकचरा व्यवस्थापन आदी निकष लावलेले आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतीला थेट निधीचा वाटप केला जातो. परंतु वृक्षांचे अस्तित्वच दिसत नाही. कोणत्या विभागाने किती वृक्ष लावले आणि त्यातील किती जिवंत आहेत याची गणना व्हावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)वृक्षप्रेमींकडून पाठपुरावापर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली त्यांनी केवळ खड्डे खोदून ठेवले. परिणामी योजनेची वाट लागली. याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी तालुक्यातील वृक्षप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला आहे.