शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पुष्पकुंजमध्ये भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 AM

पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर रऊफभाई यांचा गादी कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून पालिकेच्या अग्नीशमन विभागातील फायरमन अजय गुजरे यांचे कच्चे घर आहे. तेथे पाणीपुरी विकणारे भाड्याने राहतात. त्यांच्या पाणीपुरीच्या दोन गाड्या तीन लाख रुपये किमतीच्या जळून खाक झाल्या.

ठळक मुद्देगादी कारखाना जळाला । दोन गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन दुचाकी जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडर लिक असल्याने भीषण आग लागली. यावेळी शेजारील पाणीपुरीवाल्याकडे असलेले एक गॅस सिलिंडर फुटल्याने आग आणखीनच वाढली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर रऊफभाई यांचा गादी कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून पालिकेच्या अग्नीशमन विभागातील फायरमन अजय गुजरे यांचे कच्चे घर आहे. तेथे पाणीपुरी विकणारे भाड्याने राहतात. त्यांच्या पाणीपुरीच्या दोन गाड्या तीन लाख रुपये किमतीच्या जळून खाक झाल्या. या घरालाही आग लागली.यावेळी घरात असलेल्या महिला व मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच यवतमाळ नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाचे दोन बंब दाखल झाले. परंतु त्यापैकी एकात पाणीच नसल्याने या बंबला ऐनवेळी पाणी भरण्यासाठी जावे लागले. गादी कारखान्याच्या बाजूने असलेल्या अ‍ॅक्वा व अन्य दुकानांनाही आगीचा फटका बसला. विशेष असे या आगीत भक्ष्यस्थानी सापडलेले घर हे अग्नीशमन विभागात कार्यरत कर्मचाऱ्याचेच आहे.अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी तीन बंब पाण्याचा वापर करून या आगीवर नियंत्रण मिळविले. टीनपत्र्याचे लाकडी बल्ल्या लावलेले घर असल्याने पूर्णत: जळून खाक झाले. टीनपत्रे काढून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. वृत्तलिहिपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात आली होती. या आगीत झालेले नुकसान हे २० लाखांच्या घरात असल्याची माहिती घरमालक अजय गुजरे यांनी ‘लोकमत’ला दिलीअग्नीशमन विभाग कर्मचाºयाचेच घर आगीच्या भक्ष्यस्थानीशनिवारी सकाळी १०.३० वाजता फायरमन अजय गुजरे यांच्या घरी गॅस सिलिंडर लिक असल्याने त्याचा स्फोट झाला. यातून आग लागली. आगीने घरासमोर भाड्याने राहणाºया पाणीपुरी विक्रेत्यांच्या खोल्यांनी पेट घेतला. तेथील एक सिलिंडर आगीत गरम होवून फुटले. यामुळे आग आणखीच भडकली. यातच गादी कारखान्याने पेट घेतला. गुजरे यांच्याकडे भाड्याने राहात असलेले भाडेकरी अभिलाख सिंग अख्तर सिंग, विजय हराळ या पाणीपुरी विक्रेत्यांच्या दोन गाड्या व घरातील साहित्य जळून खाक झाले. घरात ठवेलेल्या दोन दुचाकीही जागेवरच राख झाल्या. एका पाठोपाठ दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने पुष्पकुंज सोसायटीचा परिसर दणाणला.

टॅग्स :fireआग