शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन रखडले

By admin | Updated: June 3, 2016 02:26 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे या दोन महिन्याचे वेतन झाले नसल्याने त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आर्थिक अडचण : शिक्षक संघाचे शिष्टमंडळ ‘सीईओं’ना भेटलेयवतमाळ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे या दोन महिन्याचे वेतन झाले नसल्याने त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन महिन्याचे वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला करण्याचे शासनाचे धोरण आहे. तरीही मागील वर्षभरात जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे वेतन कधीही १ तारखेला झालेले नाही. आताही एप्रिल व मे महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. वेतनाला होणाऱ्या विलंबामुळे जिल्ह्यातील शिक्षक हैराण आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला यांची राजूदास जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेऊन दोन महिन्याचे वेतन करण्याची विनंती केली. यावेळी लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांना वेतन तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी शिष्टमंडळाने बदलीचा प्रश्न उपस्थित केला. ८० टक्के शिक्षकांच्या बदल्या सोईच्या झाल्याने संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द न करता अन्यायग्रस्तांच्या आदेशात अंशत: बदल करून आदेश निर्गमित करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. बदली प्रसंगी तीन दिवस चार हजार शिक्षकांची बसण्याची, पाण्याची आणि यादी पाहण्याची व्यवस्था शिक्षक संघाने केली होती. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याबद्दल त्यांनी शिक्षक संघाचे कौतुक केले. शिष्टमंडळात गौतम कांबळे, राजेंद्र पिंपळशेंडे, दीपक दोडके, रवी आडे, शेख लुकमान, सुरेश नरवाडे, विजय डंभारे, आसाराम चव्हाण, नदीम पटेल, रवी राठोड, सुदर्शन चव्हाण, बबनराव मुंडवाईक, सुनील राठोड आदींचा समावेश होता. (वार्ताहर)