प्रात्यक्षिकाच्या गुणांसाठी शिक्षकांची रेटारेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:07+5:30

दहावीच्या परीक्षेत घेतल्या जाणाºया प्रॅक्टीकलमध्ये शाळा विद्यार्थ्यांना गुणदान करते. गुणदानाचा हा अहवाल बोर्डाला सादर करायचा असतो. त्याकरिता एकाच वेळी सर्वांना बोलविले गेले. सकाळी ११ वाजताची वेळ आधी कळविण्यात आली होती. मात्र गुरूवारी हे वेळापत्रक अचानक बदलण्यात आले. दुपारी २.३० वाजता दस्तऐवज स्वीकारले जाईल, असा फलक लावण्यात आला.

Teacher's hierarchy of practicle marks | प्रात्यक्षिकाच्या गुणांसाठी शिक्षकांची रेटारेटी

प्रात्यक्षिकाच्या गुणांसाठी शिक्षकांची रेटारेटी

ठळक मुद्देएक कर्मचारी जखमी : बोर्डाच्या कारभाराने शिक्षक संतप्त, ऐनवेळी वेळापत्रक बदलल्याने गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माध्यमिक शालांत प्रात्यक्षिक परीक्षेच्या गुणांचा अहवाल सादर करण्यासाठी गुरुवारी येथील अभ्यंकर कन्या शाळेत शिक्षकांना बोलावण्यात आले. मात्र बोर्डाच्या नियोजनशून्यतेमुळे कर्मचाऱ्यांना तब्बल पाच तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर सूचना मिळताच गोंधळ उडाला. रेटारेटी होऊन एक कर्मचारी कोसळून जखमी झाला. या ढिसाळ कारभारामुळे बोर्डावर कर्मचाऱ्यांनी संताप नोंदविला.
दहावीच्या परीक्षेत घेतल्या जाणाºया प्रॅक्टीकलमध्ये शाळा विद्यार्थ्यांना गुणदान करते. गुणदानाचा हा अहवाल बोर्डाला सादर करायचा असतो. त्याकरिता एकाच वेळी सर्वांना बोलविले गेले. सकाळी ११ वाजताची वेळ आधी कळविण्यात आली होती. मात्र गुरूवारी हे वेळापत्रक अचानक बदलण्यात आले. दुपारी २.३० वाजता दस्तऐवज स्वीकारले जाईल, असा फलक लावण्यात आला. मात्र याची माहिती कर्मचाºयांपर्यंत पोहचलीच नाही. यामुळे जिल्ह्यातील ४०० शाळांमधील कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ पासूनच गर्दी केली होती. त्यांना अडीचपर्यंत तटकळत रहावे लागले. २.३० वाजता अभ्यंकर कन्या शाळेतील पेपर संपल्यानंतर गेट उघडण्यात आले. यात एकच गोंधळ उडाला. आधी नंबर लागावा म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा होती. या गोंधळात एक कर्मचारी खाली कोसळला. त्याचा पँट फाटला. गंभीर इजा झाली. त्याला रूग्णालयात नेण्यात आले. यानंतरही या ठिकाणी असलेल्या बोर्ड प्रतिनिधीला कुठलाही संकोच वाटला नाही. या प्रकाराने शिक्षक संतापले होते.

Web Title: Teacher's hierarchy of practicle marks

टॅग्स :examपरीक्षा