शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बोथबोडनमध्ये मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By admin | Updated: July 2, 2017 01:26 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

कर्जमाफी : शेतकरी विधवांचे अभिनव आंदोलन, नेरमध्ये नोंदविला निषेध लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शासनाच्या या आदेशाचा निषेध म्हणून बोथबोडण येथील शेतकरी विधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त केला. शासनाने सरसकट कर्जमाफी दिली नाही, यापेक्षाही उग्र आंदोलनाचा निर्धार त्यांनी केला. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून देशपातळीवर बोथबोडणची ओळख आहे. अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्थांनी या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. काहींनी गावात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र या गावाची स्थिती अद्याप सुधारली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्ज माफ करतील, अशी अपेक्षा तेथील शेतकरी विधवांना होती. तथापि शासनाने कर्जमाफीत घातलेल्या जाचक अटींमुळे या शेतकरी विधवांना कोणताच लाभ झाला नाही. त्याचा संताप म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी झाले. शेतकरी विधवा नाझीबाई राठोड यांनी हाती आगटं धरलं, तर शांताबाई वरणकर, चंद्रकला शेळके, सुंदरबाई चव्हाण, लिलाबाई पुरी, देवकाबाई जाधव, अनुसया देवकर आदींनी प्रतिकात्मक प्रेतयात्रेत खांदा दिला. यावेळी शासनविरोधी निदर्शने करण्यात आली. अनुप चव्हाण, रोहित राठोड, जितेंद्र राठोड, श्याम राठोड, दत्ता राठोड, अनिल राठोड, सत्यम जाधव यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. शेतकरी विधवा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होते. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा फिरल्यानंतर शेवटी स्मशानभूमीजवळ अंत्यविधी करण्यात आला. शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर पालकमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी विधवांनी दिला. कर्जमाफीच्या ‘जीआर’ची होळी नेर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे. त्यांचे राज्य रयतेसाठी होते. मात्र महाराष्ट्र सरकार महाराजांचे नाव घेवून शेतकऱ्यांना फसवत आहे, असे सांगून कर्जमाफीसंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची येथे होळी करण्यात आली. युवा शेतकरी संघर्ष समितीने दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला. कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा निर्णय घेण्यात आला. शासन बोगस, जीआर बोगस अशा घोषणा देत जीआरची होळी करण्यात आली. यावेळी गोपाल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत, संतोष अरसोड, सतीश चवात, मुकुंद गावंडे, गौरव नाईकर, रवी गाडे, पुरुषोत्तम राठोड, सदानंद पेचे, स्वप्नील शेटे, मिथून अलाटे, मिथून भगत, विशाल चहाकार, राजू भोयर, सुदाम राठोड, गजानन दहेलकर, विजय राठोड, गणेश ठाकरे, गोपाल खडसे आदी उपस्थित होते.