शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

निकाल ऐकण्यासाठी सोसले उन्हाचे चटके

By admin | Updated: May 17, 2014 00:30 IST

सकाळी ८ वाजतापासून मतगणनेला सुरुवात झाली. ९.३0 वाजताच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवायला लागले. दुपारी १२ वाजेपर्यंत तर सूर्य डोक्यावर आला होता.

यवतमाळ : सकाळी ८ वाजतापासून मतगणनेला सुरुवात झाली. ९.३0 वाजताच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवायला लागले. दुपारी १२ वाजेपर्यंत तर सूर्य डोक्यावर आला होता. दर अर्धा तासाने माईकमधून फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी घोषित होत होती. उन्हाचे चटके सोसत नागरिक ही आकडेवारी जाणून घेत होते. त्यांचा हा उत्साह वाखाणण्याजोगाच होता.

निवडणूक विभागाने १६ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे घोषित केले होते. त्यासाठी पूर्वसंध्येलाच तयारी करण्यात आली. विना विलंब सकाळी ८ वाजताच्या सुमारास मतदान गणनेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार अँड. शिवाजीराव मोघे आघाडीवर होते. पहिल्या फेरीची घोषणा होताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. प्रतिबंधित क्षेत्रापुढे लागून असलेल्या पोलिसांच्या बॅरेकपुढे घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. सूर्य आग ओकत असताना साधारणत: ११ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी ऐकण्यासाठी गोळा झालेली नागरिकांची गर्दी ओसरेल असा अंदाज होता. मात्र सूर्य जस जसा डोक्यावर येत होता तस तशी नागरिकांची गर्दी मतदानाची आकडेवारी ऐकण्यासाठी वाढतच होती. त्यातच दुसर्‍या फेरीपासून भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेतली. या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी तेथून ओसरली. मात्र शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची जागा घेतली. फेरीनिहाय मतदानाच्या आकडेवारीची घोषणा होताच ती स्पष्ट ऐकू यावी म्हणून नागरिक पोलिसांनी लावलेल्या बॅरेकजवळ यायचे. घोषणा आणि नारेबाजींनी परिसर दणाणून सोडायचे. उन्हाचे चटके सोसत त्यांनी मतमोजणीची आकडेवारी जाणून घेतली. त्यांचा हा उत्साह भावना गवळी यांच्या विजयाचा जल्लोषच असल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे या गर्दीला नियंत्रणासाठी पोलिसांनाही फारशी कसरत करावी लागली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)