शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत प्रेमीयुगुलाची विहिरीत आत्महत्या

By admin | Updated: January 18, 2015 22:47 IST

घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

कुटुंबीयांचा लग्नास विरोध : ओढणीने एकमेकांना बांधून घेतली उडी, परिसरात हळहळ घाटंजी : घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी या दोघांनीही एकमेकांना ओढणीने बांधून उडी घेतली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून विहिरीवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. श्रीकांत अवधूत डगमल (२५) रा. घाटी घाटंजी आणि सुवर्णा भास्कर नारनवरे (२०) रा. बेलोरा (नवोदय) ता. घाटंजी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. नात्याने चुलत आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या सुवर्णा आणि श्रीकांत दोन-तीन वर्षापूर्वी एकमेकांच्या प्रेमात पडले. सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या. फुलत असलेल्या या प्रेमाला मात्र घरच्यांचा विरोध होता. नात्यात असूनही घरचे विरोध करीत होते. त्यामुळेच त्यांनी एकसाथ जगता येत नाही, पण एकसाथ मरता येईल असा विचार केला. घाटी येथील बाजार समितीच्या बैलबाजार भरणाऱ्या परिसरात असलेल्या विहिरीत दोघांनी एकमेकांना ओढणीने बांधून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. परिसरातील काही लोकांना विहिरीजवळ एका प्लास्टिकमध्ये ब्लाऊज कापड, दोन मोबाईल आदी वस्तू आढळून आल्या. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन विहिरीत शोध घेतला असता एकमेकांना बांधलेल्या अवस्थेतील सुवर्णा आणि श्रीकांतचे प्रेत आढळून आले. घटनेची माहिती घाटंजीत पोहोचताच अनेकांनी या विहिरीकडे धाव घेतली. सुवर्णा ही यवतमाळ येथे शिवणक्लास करीत होती. ती यवतमाळातच एका नातेवाईकाकडे राहत होती. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास यवतमाळवरून परस्पर घाटंजीत आली तर श्रीकांत हा घरुन सायंकाळी ५ वाजता बाहेर निघून गेला होता. श्रीकांत हा दहावीपर्यंत शिकलेला होता. तो गवंडी कामावर रोजंदारीने काम करीत होता. सुवर्णाचे आई-वडील बेलोरा येथे रोजमजुरी करतात. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास ठाणेदार भारत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश मार्इंदे, जमादार एस.के. दुबे, एस.सी. वाघाडे अधिक तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)